गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 08:00 PM2018-01-01T20:00:05+5:302018-01-01T20:00:21+5:30

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे

Gomantankia has been denied by AAP, for the sake of political existence and against others | गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप

गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप

Next

पणजी : आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ३९ पैकी ३८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करुन गोव्यातील मतदारांनी आम आदमी पक्षाला चांगलाच धडा शिकविला आहे. या पक्षाचे गोव्यात कोणतेही अस्तित्त्व राहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला. 

आम आदमीचे प्रदेश सचिव प्रदीप पाडगांवकर यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्यावर टीका करताना राज्यातील भाजप आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम हा निव्वळ फार्स असल्याची टीका केली होती. बिगरभाजप मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच आम आदमी पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविले. हे उमेदवार आता आहेत कुठे, असा सवाल करताना डिमेलो यांनी अशी टीका केली की, या पक्षाकडे आता जेमतेम चार ते पाच माणसेच राहिलेली आहेत. 

बिगरभाजप मतांमध्ये फूट पाडण्याचा आम आदमी पक्षाचा डाव होता. गोवा फॉरवर्डने आपले उमेदवार रिंगणात उतरविल्याने तो फसला. आपचे मनसुबे साध्य झाले असते तर भाजपला २१ जागा मिळाल्या असत्या, असे ट्रोजन म्हणाले. 

फातोर्डा मतदारसंघात सरदेसाई यांना शह देण्यासाठी कार्व्हालो नामक उमेदवार रिंगणात उतरविला. हा कार्व्हालो फातोर्डा मतदारसंघातील रहिवाशी नव्हे. बाहेरुन आणून उमेदवार लादला. लोकांनी त्याला नाकारले. आता त्याचे अस्तित्त्वच दिसत नाही. आपचे बहुतांश उमेदवार कुठेच दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. 

विजय सरदेसाई हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय घेत आहेत. गोमंतकीयांचे हित जपण्याला ते प्राधान्य देत आहेत. गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण जपण्याची अट घालूनच गोवा फॉरवर्डने भाजपबरोबर आघाडीचे सरकार बनविले आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूवर कोणी संशय घेण्याचे कारण नाही, असेही ट्रोजन म्हणाले.

Web Title: Gomantankia has been denied by AAP, for the sake of political existence and against others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप