दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते - मनोहर पर्रिकर

By Admin | Updated: February 4, 2017 10:59 IST2017-02-04T10:40:18+5:302017-02-04T10:59:10+5:30

मनोहर पर्रिकरांना दिल्लीचा कंटाळा आला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Goa's favorite food than Delhi - Manohar Parrikar | दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते - मनोहर पर्रिकर

दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते - मनोहर पर्रिकर

 ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 4 - मनोहर पर्रिकरांना दिल्लीचा कंटाळा आला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गोव्याचे मुख्यमंत्री बनण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना पर्रिकर म्हणाले की, 'मला दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते. आता याचा अर्थ तुम्ही काहीही काढू शकता.' या वक्तव्यावरुन पर्रिकरांनी दिल्लीपेक्षा गोव्यात राहणं अधिक पसंत असल्याचे दिसत आहे.
जनतेलाच पुन्हा परिवर्तन हवंय - उद्धव ठाकरे)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पर्रिकर पुन्हा गोव्यात वापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, 'गोव्याचा मुख्यमंत्री दिल्लीतूनही असू शकतो',  केंद्रीय नितीन गडकरी यांनी असे सांगत पर्रिकरांच्या गोव्यातील घरवापसीबाबत संकतेही दिले होते. त्यानंतर आता पर्रिकरांनी दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते, असे विधान केले आहे. 
(गोवा-पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात, पर्रिकरांनी बजावला मतदानाचा हक्क)
त्यामुळे पर्रिकर गोवावापसी करणार कि आपली दिल्लीवारी कायम ठेवणार?, हे येत्या काळात स्पष्ट होईल. 
 

Web Title: Goa's favorite food than Delhi - Manohar Parrikar