Goa tourism in bad condition; police looters, industrialists attack | गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल

पणजी : राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पोलिस, टॅक्सी व्यवसायिक व इतरांकडून पर्यटकांचा छळ केला जातो. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना तर पर्यटनातील काही कळतच नाही, अशा शब्दांत टुर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनच्या काही सदस्यांनी टीका सोडले.


संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसायस, माजी अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा, ज्ॉक सुखिजा, श्री. धोंड, थॉमस कुकचे अनस डायस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार दरवर्षी गोव्यात पर्यटकांची संख्या खूपच मोठी सांगत आहे. प्रत्यक्षात आमचा त्या आकडेवारीवर मुळीच विश्वास नाही. सरकारने आमच्यासोबत संयुक्तपणो डिसेंबर महिन्यात सव्रेक्षण करून घ्यावे. मग खरी आकडेवारी कळेल, असे सावियो मेसायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे 2क्17 च्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करत होते तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो. खाण धंदा बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय तरी नीट चालावा म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती पर्यटन मंत्रीपदी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती व त्यांनी होकार दिला होता. नोटबंदी, जीएसटी अशा केंद्राच्या विविध निर्णयांनी गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रत मंदी आणली पण पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अजून एकदाही आम्हाला भेट दिलेली नाही. माविन गुदिन्हो व अन्य सगळे मंत्री मात्र आम्हाला भेटले. आजगावकर का भेटत नाहीत ते कळत नाही. त्यांना पर्यटनातील काही कळतही नाही, असे फ्रान्सिस ब्रागांझा म्हणाले. गोव्यात येणा:या पर्यटकांची गाडी अगोदर पोलिस अडवतात. पर्यटक म्हणजे जणू गुन्हेगारच आहे असे मानले जाते. 4क् टक्के पर्यटक संख्या कमी झाली आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. टॅक्सी व्यवसायिक व टॅक्सी चालकांविरुद्ध विदेशी पर्यटकांकडून आमच्याकडे दर आठवडय़ाला किमान दोन तरी तक्रारी येतात. त्यांच्याकडून लुबाडणूक केली जाते असे पर्यटक सांगतात. डिजीटल मीटर, अॅप सिस्टम वगैरे टॅक्सींसाठी सरकारने लवकर आणावी, अशी मागणी मेसायस यांनी केली.


विवाह सोहळेही अडतात
जास्त खर्च न करणा:या तसेच पर्यावरणाविषयी काही देणोघेणो नसलेल्या व चांगले वर्तनही न करणा:या देशी पर्यटकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे ही गोष्ट चांगली नव्हे. त्यांच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करायला हवे. कळंगुटच्या पट्टय़ातील हॉटेल व्यवसायिक तर अशा पर्यटकांना कंटाळले आहेत. राज्यात नोंदणी न करता शेकडो छोटी हॉटेल्स चालवली जात आहेत. त्यांच्याकडून सरकारला काही महसुलही मिळत नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. गोव्यात मोठे विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी जीसीङोडएम, पंचायत व अन्य ब:याच यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. जीसीङोडएमची बैठक तर महिन्याला दोनचवेळा होते. परवानगीवीना विवाह सोहळे रद्द करावे लागतात. केरळमध्ये तर कोणतेच शूल्क व परवान्यांवीना विवाह सोहळे पार पडतात. असे मेसायस म्हणाले. 


गोव्यातील कचरा समस्या, वारंवार खोदले जाणारे रस्ते, अस्वच्छ किनारे या सगळ्य़ा समस्यांमुळे पर्यटक गोव्याला कंटाळतात. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम हे पर्यटन खात्याला जमत नाही, तरीही किनारपट्टी कंत्रटासाठी निविदा तेच खाते जारी करते. सन बर्न, सेरंडिपीटी आदी महोत्सव गोव्यात झाले तर जास्त पर्यटक येतात. मात्र विविध प्रकारच्या परवान्या व विविध प्रकारचे शूल्क महोत्सवाच्या आयोजकांना भरावे लागते. आम्ही तर म्हणतो की अशा महोत्सवांसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे मेसायस म्हणाले.


Web Title: Goa tourism in bad condition; police looters, industrialists attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.