Goa: जनतेचे ५९ कोटी रुपये निकृष्ट कामावर खर्च झाल्याची खंत: चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशन

By पूजा प्रभूगावकर | Published: April 23, 2024 01:14 PM2024-04-23T13:14:38+5:302024-04-23T13:14:52+5:30

Goa News: कला अकादमीच्या निकृष्ट दर्जाच्या नुतनीकरण कामावर जनतेचे ५९ कोटी रुपये सरकारने खर्च केल्याची खंत आम्हाला असल्याची टीका चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनने  केली आहे.

Goa: Public regrets spending Rs 59 crore on shoddy work: Charles Quraiya Foundation | Goa: जनतेचे ५९ कोटी रुपये निकृष्ट कामावर खर्च झाल्याची खंत: चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशन

Goa: जनतेचे ५९ कोटी रुपये निकृष्ट कामावर खर्च झाल्याची खंत: चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशन

- पूजा नाईक प्रभूगावकर 

पणजी - कला अकादमीच्या निकृष्ट दर्जाच्या नुतनीकरण कामावर जनतेचे ५९ कोटी रुपये सरकारने खर्च केल्याची खंत आम्हाला असल्याची टीका चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनने  केली आहे.

कला अकादमी इमारत नुतनीकरण तसेच त्याच्या संवर्धन प्रक्रियेपासून आम्हाला दूर ठेवले. इमारतीत प्रवेशही नाकारण्यात आला.इमारतीच्या नुतनीकरण तसेच त्याच्या अन्य कामांविषयी सरकारला आम्ही मार्गदर्शन केले असते. तसेच आवश्यक त्या सूचनांही केल्या असत्या. परंतु तशी संधी आम्हाला दिली नाही असे फाऊंडेशन ने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

कला अकादमीच्या पहिल्या मजल्याचे फॉल्स सिलिंग कोसळल्याने या इमारत नुतनीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील काही महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोसळला तर दुसऱ्या एका घटनेत मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहाचे छत गळू लागल्याने सभागृहात पाणी साचले होते.यामुळे कला अकादमीचे नुतनीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Goa: Public regrets spending Rs 59 crore on shoddy work: Charles Quraiya Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा