भूगर्भ शास्त्रज्ञ रामनाथ शेटगावकरला अटक, घोटाळेबाजांशी संधान तपासातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:28 PM2017-11-07T21:28:52+5:302017-11-07T21:29:29+5:30

पणजी: खाण घोटाळा प्रकरणात तपास करणा-या विशेष तपास पथकाकडून खाण खात्याचे वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ रामनाथ शेटगावकर यांना अटक केली.

Geologist scientist Ramnath Shetgaonkar arrested and arrested with the investigators of the scam | भूगर्भ शास्त्रज्ञ रामनाथ शेटगावकरला अटक, घोटाळेबाजांशी संधान तपासातून उघड

भूगर्भ शास्त्रज्ञ रामनाथ शेटगावकरला अटक, घोटाळेबाजांशी संधान तपासातून उघड

Next

पणजी: खाण घोटाळा प्रकरणात तपास करणा-या विशेष तपास पथकाकडून खाण खात्याचे वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ रामनाथ शेटगावकर यांना अटक केली. घोटाळे आणि उल्लंघने लपविण्यासाठी शुल्लक दंडाची रक्कम आकारून प्रकरणांवर पांघरूण घालण्याचे प्रकार त्यांनी केल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते.

रामनाथ शेटगावकर यांना चौकशीसाठी बोलावून नंतर त्याला अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्याची एसआयटीकडून चौकशी चालू होती. एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेटगावकर याचा खनिज घोटाळ्यात थेट सहभाग आहे आणि त्याचे पुरावेही आहेत. खाण घोटाळा केलेल्या उद्योजकांना रानमोकळे सोडण्यासाठी, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर पांघरून घालण्याचे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्याचे काम शेटगावकर यांनी केले आहे. खाण प्रकरणात तपासालाही ते सहकार्य करीत नाहीत असे एसआयटीचे म्हणणे आहे.

शेटगावकर हे खाण खात्यात वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून काम करताना खनिज लॉबीशी संधान बांधून वावरल्यासारखेच त्यांचे काम असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: भूगर्भातील खनिज उत्खननाच्या मर्यादेचे पालन करून घेणे हे त्यांचे काम. उत्खनन होत असलेल्या ठिकाणी जाऊन पहाणी करणे. तक्रारींची दखल घेऊन कारवाई करणे ही त्यांची कामे. त्याप्रमाणेत्यांनी उत्खनन होत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन परीक्षणे केली आहेत.

परंतु पहाणी नंतर जे काही करण्यात आले त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपाची उल्लंघने घडलेली असतानाही त्यावर पांघरूण घालण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारच्या तिजोरीत कोठ्यवधीचा महसूल बुढविण्यात आला आहे असे ढळढळीत दिसत असतानाही अवघ्या अडीच लाख रुपयांपर्यंत दंड आकारून प्रकरण मिटविण्याचे प्रकार त्यांनी केल्याचे एक नव्हे तर अनेक ठिकाणी आढळून आले आहे.

Web Title: Geologist scientist Ramnath Shetgaonkar arrested and arrested with the investigators of the scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक