गोव्यात सुरे तलवारीसह गँगवॉर, ४ जखमी, ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 10:16 PM2018-06-03T22:16:50+5:302018-06-03T22:16:50+5:30

मेरशी येथे पुन्हा एकदा तलवारी, सुरी वंदुका घेऊन हाणामारीचा प्रकार घडला.

 Gangwar with Surrey swords in Goa, 4 injured and 6 others arrested | गोव्यात सुरे तलवारीसह गँगवॉर, ४ जखमी, ६ जणांना अटक

गोव्यात सुरे तलवारीसह गँगवॉर, ४ जखमी, ६ जणांना अटक

googlenewsNext

पणजी: मेरशी येथे पुन्हा एकदा तलवारी, सुरी वंदुका घेऊन हाणामारीचा प्रकार घडला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास येथील गोवेकर रेस्टॉरंटजवळ झालेल्या दोन गटांतील मारामारीत ४ जण जखमी झाले असून इस्पितळात उपचार घेत आहेत.सहा जणांना जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
रात्रीच्यावेळी येथील बार एण्ड रेस्टॉरंटमध्ये चिंबलचे काही युवक बसले होते. त्यानंतर तिथे मेरशीतील एक गट आला आणि दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. बाचाबाची नंतर मारामारीवर आली. दोन्ही गटात भीषण हाणामारी होवून ४ जण जखमी झाले आहेत. चौघांनाही गोमेकॉत दाखल करण्यात आले. पोलीसांनी ६जणांना अटक केली आहे तर पळून गेलेल्या इतरांच्या शोधात पोलीस आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारामारीतील एक गट चिंबलचा तर दुसरा गट मेरशी येथील आहे. चिंबलचा गट मेरशी येथील गोवेकर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये बसलेला असता तेथे मेरशीचा गट अला. चिंबलच्या गटातील युवकांची नावे जोशुआ तलवार, मुबारक मुल्ला, शेनबाज मुल्ला, नियाझ बेग, अख्तर मुल्ला, अब्दुल मालदार, समीर मुल्ला, अतिफ निरगी आणि निसार नामक एक असून सर्व ९ जण हे चिंबल येथील आहेत. मेरशी गटातील युवकांची नावे सुरज शेट्ये, मार्शेलीन डायस, विशाल गोलतकर आणि गौरेश् नाईक अशी आहेत. सर्वजण मेरशी येथे राहणारे आहेत. दोन्ही गटांतील युवक हे गुन्हेगारी पार्श्वभुमिचे आहेत. यापूर्वीही त्यांचा अनेक गुन्ह्यात समावेश होता.
मेरशीत रेस्टॉरंटजवळ मारामारी चालू असल्याची माहिती पोलिसांना कुणी तरी फोन करून दिली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ८ जणांना अटक करण्यात आले. जखमींना इस्पितळात नेले तर इतर पळून गेले. त्या ठिकाणी तलवारी, सुरे पोलिसांना सापडले. पोलिसांनी दोन मोटरसायकल व पाच स्कूटरही जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे.
मेरशीतील दोन गटांच्या या गँगवॉरमुळे सुमारे ९ महिन्यापूर्वी याठिकाणी झालेल्या गुंढगिरीच्या घटनांच्या लोकांच्या स्मृती ताज्या झाल्या. गोव्याबाहेरून आलेल्या एका पर्यटक परिवारावर येथील पाच सहा गुंढांनी सशस्त्र हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. अगधी शुल्लक करारणावरून भांडण उरकून काढून त्या पर्यटक परिवारांतील सदस्यांना रक्तबंबाळ करण्याची घटना या ठिकाणी घडली होती. या घटनेमुळे गोव्याची देशभर नाचक्की झाली होती.
मागे गोव्याबाहेरील पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात ज्या गुंढांनी सहभाग घेतला होता त्यातील दोघांचा सहभाग या मारामारीतही होता. त्या प्रकरणातून हे जामीनवर सुटले होते. जामीनवर असताना इतकी गुंढगिरी तर बिनशर्त सुटका केल्यास ते काय करतील याची कल्पनाही करवत नसल्याचे तेथील लोक सांगतात. शब्बील मुल्ला, नियाज बेग, अख्तर मुल्ला, मार्शेलीन डायस, विशाल गोलतेकर, गौरेश नाईक अशी आहेत. सुरज शेटये हा सतत तीनवेळा गुन्हेगारी प्रकरणात अडकलेला असून या हाणामारीत तोच सर्वाधिक जखमी झाला आहे. गोमेकॉत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title:  Gangwar with Surrey swords in Goa, 4 injured and 6 others arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.