छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शिवगोमंतगाथा संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 06:37 PM2017-11-16T18:37:36+5:302017-11-16T18:37:46+5:30

म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगोमंतगाथा हे दोन दिवसीय शिवचरित्र संमेलन साखळी-गोवा येथे आयोजित करण्यात आले

Chhatrapati Shivaji Maharaj's meeting on the occasion of 350th anniversary of Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शिवगोमंतगाथा संमेलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शिवगोमंतगाथा संमेलन

Next

म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगोमंतगाथा हे दोन दिवसीय शिवचरित्र संमेलन साखळी-गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, १८ व रविवार, दि. १९ नोव्हेंबर असे दोन दिवस होणा-या या संमेलनाचे उद्घाटन दि. १८ रोजी सायं. ४ वा. श्रीमंत संभाजी छत्रपती राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिवाजी आणि गोमंतक यांच्यातील संबंध लोकांच्या स्मरणात राहावा यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी सभापती तसेच कार्यक्रम समितीचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांनी दिली. यावेळी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, तुषार टोपले, आनंद मयेकर, विजय तिनईकर हे उपस्थित होते. १९ नोव्हेंबर १६६७ रोजी शिवाजी महाराजांचे पहिल्यांदा गोव्यात कोलवाळ येथे आगमन झाले. त्यावेळी कोलवाळ किल्ल्यावर कब्जा असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला करुन त्यांना तेथून पिटाळून लावले. त्या किल्ल्यावर महाराजांनी दोन दिवस वास्तव्य केले. काही काळ वास्तव्य करुन पुन्हा माघारी गेल्यानंतर गोव्यात आले. त्यांनी गोव्यात नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. सामाजिक स्थैर्य निर्माण केले. राष्ट्रवाद निर्माण केल्याचे आर्लेकर म्हणाले.

महाराजांनी गोव्यात आल्यानंतर पहिल्यांदा कोलवाळ येथे दाखल झाल्याने १८ रोजी कोलवाळ येथील राममंदिरापासून साखळीपर्यंत शिवगोमंत रथ यात्रा सुरु होणार आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजता डिचोलीतील शिवाजी मैदानावरुन ही यात्रा साखळीला प्रयाण करणार आहे. त्या ठिकाणी संमेलनाचे उद्घाटन महाराजांचे चौदावे वारस श्रीमंत संभाजी छत्रपती राजे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, स्वागताध्यक्ष सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार राजेश पाटणेकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून समन्वयक भारतीय संतसभा डॉ. संदीप महिंद्र हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराजांनी गोव्यात काबीज केलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पुरातत्व विभागाच्या सहकार्याने आयोजित केले आहे. उद्घाटनानंतर शिवकल्याण राजा या महाराजांच्या जीवनावर आधारीत सांगितीक कार्यक्रम सादर होणार आहे.

रविवार, दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोमंतकातील कार्यवर आधारीत माहितीपट सादर होणार आहे. त्यानंतर शिवरायांची मराठी संस्कृतीला देणगी यावर डॉ. अशोक कामत यांचे व्याख्यान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र या विषयावर डॉ. अविनाश मोहरिल मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार यावर अ‍ॅड. आनंद देशपांडे आपले विचार व्यक्त करतील. संमेलनाच्या समारोप सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य याविषयावर पांडुरंग बलकवडे (पुणे) हे विचार व्यक्त करतील. समारोपाला विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj's meeting on the occasion of 350th anniversary of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा