बीफ खाणाऱ्यांना चौकात फाशी द्या - साध्वी सरस्वती

By Admin | Updated: June 15, 2017 01:45 IST2017-06-15T01:45:57+5:302017-06-15T01:45:57+5:30

बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे. त्यांचे शरीर जेव्हा चौकात लटकवले जाईल, तेव्हा असे मांस खाण्याचे धाडस कोणी करणार

Beef beats hang in the square - Sadhvi Saraswati | बीफ खाणाऱ्यांना चौकात फाशी द्या - साध्वी सरस्वती

बीफ खाणाऱ्यांना चौकात फाशी द्या - साध्वी सरस्वती

- सुरेश गुदले । लोकमत न्यूज नेटवर्क
रामनाथी (फोंडा, गोवा) : बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे. त्यांचे शरीर जेव्हा चौकात लटकवले जाईल, तेव्हा असे मांस खाण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा इशारा सनातन धर्म सेवा प्रचार समितीच्या छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील साध्वी सरस्वती यांनी बुधवारी येथे दिला. केंद्र सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
हिंदू जनजागृती समितीच्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील विविध संघटनांचे १५०पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.
साध्वी सरस्वती म्हणाल्या, भारत हिंदू राष्ट्र करूच. ते पाकिस्तानात गेले तर ठीक, नाहीतर पाकिस्तानही हिंदू राष्ट्र करू. शांततेने चर्चेची वेळ निघून गेलेली आहे, आता हत्यारे उचलावीच लागतील. मुलायम सिंह हा शब्द उच्चारणेदेखील पाप आहे.
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, देशाची फाळणी धर्मावर आधारित झाली. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत घुसडला. आता हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. जेएनयू ही देशद्रोह्यांची टोळी आहे. लोकशाहीत बहुमताने निर्णय घ्यायचे असतात; मग ८० टक्के हिंदू असताना त्यांच्या हिताचे निर्णय कसे होत नाहीत? हिंदूंना सक्तीचे कुटुंब नियोजन, इतरांना मात्र मोकळीक असे का, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Beef beats hang in the square - Sadhvi Saraswati