गडचिरोतीत काँग्रेस नेत्याची हत्या
By Admin | Updated: May 25, 2014 09:39 IST2014-05-25T09:35:39+5:302014-05-25T09:39:45+5:30
गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे.

गडचिरोतीत काँग्रेस नेत्याची हत्या
>ऑनलाइन टीम
गडचिरोली, दि. २५ - गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनीच ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असून याविषीय अद्याप पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.