Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:30 PM2019-05-07T20:30:50+5:302019-05-07T20:45:17+5:30

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले.

Gadchiroli Naxal attack: ... it would have to life of the police, the intimidation | Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला

Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला

googlenewsNext

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिका-यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावल्या जात आहे.

जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अशी एकूण ३४ वाहने गडचिरोली पोलिसांना मिळाली आहेत. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत. नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते. परिणामी अधिका-यांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.

वास्तविक त्यांच्यासाठी भूसुरूंग रोधक वाहन उपलब्ध असते आणि त्यातून हे जवान गेले असते तर स्फोटाची झळ कमी प्रमाणात जाणवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते.

भूसुरूंग रोधक वाहनांची क्षमता काय?
नक्षलवाद्यांनी गेल्या १२ वर्षात ३ वेळा भुसूरूंग रोधक वाहने स्फोटात उडविली आहेत. त्यात झालेली वाहनांची हाणी पाहता या वाहनांची खरोखरच किती स्फोटक सहन करण्याची क्षमता आहे याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मे २०१७ मध्ये भामरागड-कोटी मार्गावर घडवून आणलेल्या स्फोटात भूसुरूंग रोधक वाहनाचे मोठे नुकसान होऊन दोन पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या वाहनांची स्फोटक सहन करण्याची क्षमता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

खबरीमुळे यशस्वी झाला नक्षलवाद्यांचा डाव
दादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारी महिन्यातच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ यांनी शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान मागचापुढचा विचार न करता निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याची माहिती कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे तो खबरी कोण? याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

Web Title: Gadchiroli Naxal attack: ... it would have to life of the police, the intimidation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.