ठळक मुद्देहॉटेलमधला हा किळसवाणा प्रकार पाहाल तर पिझ्झा-बर्गर विसरून जाल.हॉटेलमध्ये अस्वच्छता बाळगणे म्हणजे शेकडो ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे.अन्न परिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नियम पाळणे आणि अटींमध्ये काम करणे, आवश्यक असते.

सेंट्रल पार्क :  मध्यंतरी भारतातील मॅकडोनल्डमध्ये झुरळं, उंदिर सापडली होती. त्याआधी ठाण्यातील एका पाणीपुरीवाल्याने तिखट पाण्यासाठी त्याच्या मुत्राचा वापर केला होता. अन्नपदार्थांसाठी लागणारी जिन्नस कमी पडू लागली की हॉटेलमालक किंवा स्टॉलमालक ग्राहकांच्या आरोग्याचा अजिबात विचार करत नाहीत आणि त्यांच्या आरोग्याला घातक असलेल्या वस्तूंचाच वापर करतात. असाच एक प्रकार अमेरिकेतील सबवे मध्ये घडला आहे.

अमेरिकेतील सेंट्रल पार्क येथील रुगबी सबवेमध्ये ब्रेडची कमतरता झाल्याने सबवेच्या व्यवस्थापकाने चक्क कचऱ्याच्या डब्यात असलेला ब्रेड वापरला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सिक्रेट कॅमेऱ्यामधून हा व्हिडिओ शूट झाला असून मॅनेजरच्या  अशाप्रकारामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये मॅनेजर स्वत: त्याच्या इतर कामगारांना सांगतोय की, ‘आपल्याकडे ब्रेडची कमतरता असल्याने आपण डस्टबीनमधील ब्रेड वापरुया.’ वाया गेलेले आणि ग्राहकांनी टाकून दिलेले ब्रेड या कचऱ्याच्या डब्यात असतात. मात्र तरीही ग्राहककांच्या आरोग्याचा अजिबात विचार न करता मॅनेजरने असा प्रकार केला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यावर तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी या सबवेमध्ये भेट दिली. त्यांनी केलेल्या तपासात किचनमध्ये भरपूर प्रमाणात अस्वच्छता दिसली. एखाद्या हॉटेलच्या किचनमध्ये ज्याप्रकारे स्वच्छता हवी  किंवा स्वच्छतेचे जे काही निकष दिलेले असतात ते या हॉटेल चालकांनी पाळले नसल्याचा हवाला अधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर या सबवे मॅनेजरला आरोग्य अधिकाऱ्यांकडून इशारा देण्यात आला आहे.

फूड स्टँडर्ड कोड ऑफ प्रॅक्टिस यांच्याकडून त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या निकषावर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. हा व्हिडिओ समोर आला असला तरी मॅनेजरने त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सबवेमध्ये चांगल्या दर्जाचेच अन्नपदार्थ ग्राहकांना देतो असा त्यांनी दावा केला आहे. 

सौजन्य - www.thesun.co.uk


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.