जास्त मोमोज खाल्याने होऊ शकते डिप्रेशनची समस्या, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 03:11 PM2018-10-18T15:11:33+5:302018-10-18T15:11:48+5:30

मोमोज हे असं एक स्ट्रीट फूड आहे जे स्वस्त तर मिळतं पण आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे फूड २० ते ३० रुपयात सहज मिळतं.

Momo's depression street food health awareness | जास्त मोमोज खाल्याने होऊ शकते डिप्रेशनची समस्या, जाणून घ्या कारण!

जास्त मोमोज खाल्याने होऊ शकते डिप्रेशनची समस्या, जाणून घ्या कारण!

Next

मोमोज हे असं एक स्ट्रीट फूड आहे जे स्वस्त तर मिळतं पण आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे फूड २० ते ३० रुपयात सहज मिळतं. पण हे तयार करण्यासाठी हानिकारक आणि चांगले नसलेले पदार्थ वापरल्याने याचा आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळेच या पदार्थाला खराब स्ट्रीट फूडचा दर्जा मिळाला आहे. जाणकारांचं म्हणनं आहे की, यात कोंबड्याच्या पंखांतून काढण्यात आलेल्या मांसाचा वापर होतो. तसेच आजाराने मेलेल्या कोंबड्यांचाही यात वापर होतो. तसेच गाजरसहीत इतरही भाज्यांच्या गुणवत्तेवर लक्ष दिलं जात नाही. 

आरोग्य तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे मोमोज शरीराला नुकसान पोहोचवतात. कारण यात वापरल्या जाणाऱ्या मैद्याला शुभ्र ठेवण्यासाठी आणि मुलायम ठेवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. चटणीमध्ये लाल मिरचीचा वापर केला जातो. जी शरीरासाठी हानिकारक असते. 

मोमोज आणि डिप्रेशन

मोमोजमध्ये ७० टक्के मैदा असतो, याला वैज्ञानिक भाषेत पांढरं विषही म्हटलं जातं. मैदा आरोग्यासाठी फार हानिकारक असतो. मैदा आतड्यांमध्ये लगेच चिकटतो आणि गंभीर आजारांचा धोका वाढतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मोमोजमध्ये वापरण्यात येणाऱ्या खराब भाज्या आणि चिकनमुळे डिप्रेशनचा धोका वाढतो. जे लोक रोज मोमोज खातात किंवा जास्त खातात त्यांच्या मेंदूमध्ये असे बॅक्टेरिया तयार होतात जे डिप्रेशनचं कारण ठरतात. त्यासोबतच डोकेदुखी, चक्कर येणे, गोष्टी विसरणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यालाही मोमोज कारणीभूत होऊ शकतात. जे लोक आधीच डिप्रेशनमध्ये आहेत त्यांनी मोमोज पूर्णपणे टाळावेत. 

मोमोज खाण्याचे इतर तोटे

१) मैदा खाल्याने शरीरात शुगर लेव्हल फार वाढते. कारण यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतात. 

२) ब्लड शुगर वाढल्याने रक्तात ग्लूकोज जमा होऊ लागतं, याने शरीरात केमिकल रिअॅक्शन होतं. आणि याच कारणाने हृदयासंबंधी आजारही होऊ शकतात.

३) मैद्यापासून तयार मोमोजमध्ये फायबर नसतात. याचं जास्त सेवन केल्याने पोटाचीही समस्या निर्माण होऊ शकते. याने डोकेदुखी आणि मळमळ होणे अशाही समस्या होतात. 

४) जे लोक नियमीतपणे मैद्यापासून तयार मोमोज किंवा इतर पदार्थांचं सेवन करतात त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. 

५) जेव्हा मैदा तयार केला जातो, तेव्हा यातील प्रोटीन निघून जातं. ते अॅसिडीक होतं. याने हाडांना समस्या होऊ शकते. 

६) मैद्यामध्ये ग्लूटन असतं, जे फूड अॅलर्जी निर्माण करतं. 
 

Web Title: Momo's depression street food health awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.