ब्लॅक कॉफी घेता? वेळीच व्हा सावध; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:36 PM2018-10-22T12:36:56+5:302018-10-22T12:39:27+5:30

कॉफीचं सेवन करणं जवळपास सर्वांनाच आवडतं. कुणाला कमी शुगर असलेली किंवा कुणाला कमी दूध असलेली तर कुणाला नॉर्मल शुगर असलेली कॉफी हवी असते.

If You Drink More Black Coffee, You're Probably a Psychopath says research | ब्लॅक कॉफी घेता? वेळीच व्हा सावध; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

ब्लॅक कॉफी घेता? वेळीच व्हा सावध; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

Next

कॉफीचं सेवन करणं जवळपास सर्वांनाच आवडते. कुणाला कमी शुगर असलेली किंवा कुणाला कमी दूध असलेली तर कुणाला नॉर्मल शुगर असलेली कॉफी हवी असते. पण तुमच्यापैकी कुणी ब्लॅक कॉफीचे शौकीन असाल तर तुम्हाला ही कॉफी पिण्याआधी दहा वेळा विचार करावा लागेल. 

कॉफीबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हा दावा करण्यात आला आहे की, दूध नसलेली कॉफी म्हणजेच ब्लॅक कॉफी सेवन करणाऱ्यांना सायकोपॅथचा(मानसिक समतोल बिघडलेली व्यक्ती) सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही कॉफीमध्ये Latte, Cappucino or Mochaccino सारख्या कॉफी पिणे पसंत करत असाल तर तुमची स्वभावाने सायकोपॅथ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा लोकांना आपल्या कॉफी पिण्याच्या सवयीबाबत पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे आणि सोबतच ब्लॅक कॉफी पिणाऱ्या लोकांपासूनही दूर राहण्याची गरज आहे. 

ऑस्ट्रियातील यूनिव्हर्सिटी ऑफ इंस्ब्रकमध्ये हा अभ्यास करण्यात आला. यात सांगण्यात आलं आहे की, जे लोक ब्लॅक कॉफी पितात ते स्वभावाने सायकोपॅथ आणि सॅडिस्टिक होऊ शकतात.

हा अभ्यास साधारण १ हजार लोकांच्या कॉफी पिण्याच्या सवयीबाबत करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेण्यात आली. यात ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांमध्ये काही कॉमन गोष्टी आढळल्या. त्या म्हणजे त्यांच्यात सायकोपॅथ, चिडचिडपणा आणि चिडून बोलणे या सवयी प्रमुख होत्या.

अभ्यासकांनी कडू कॉफी आणि सायकोपॅथिक असण्या दरम्यान एक लिंक बघायला मिळाली. या अभ्यासातून आणखी एक खास गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे जे लोक जास्त गोड किंवा जास्त दूध असलेली कॉफी पिणे पसंत करतात ते स्वभावाने दयाळू असतात. 

अभ्यासकांनी सांगितले की, कडू पदार्थ खाल्याने आणि कडू पेय सेवन करण्याच्या सवयीने वेळोवेळी तुमच्या स्वभावावरही प्रभाव पडतो. अशा सवयी जास्त काळ राहिल्याने तुम्हाला गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. 
 

Web Title: If You Drink More Black Coffee, You're Probably a Psychopath says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.