टॅटू काढताना या 5 गोष्टी विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:18+5:302016-02-09T05:59:32+5:30

तरुणाईमध्ये टॅटूचे क्रेझ खूप वाढले आहे. पण जर एवढय़ा मेहनतीने काढलेला टॅटू आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नसेल तर खूप पश्‍चाताप होतो.

Do not forget these 5 things while removing the tattoo! | टॅटू काढताना या 5 गोष्टी विसरू नका!

टॅटू काढताना या 5 गोष्टी विसरू नका!

googlenewsNext
ुणाईमध्ये टॅटूचे क्रेझ खूप वाढले आहे. पण जर एवढय़ा मेहनतीने काढलेला टॅटू आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नसेल तर खूप पश्‍चाताप होतो. टेक्सस विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेमध्ये ७९ टक्के लोकांनी सांगितले की त्यांचा पहिला टॅटू काढण्याचा अनुभव निराशाजनक होता. त्यामुळे विचार न करता केवळ टॅटू पाहिजे म्हणून कोणताही टॅटू शरीरावर नका गोंदवून घेऊ. त्यासाठी पुढील सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. १. स्पेलिंग आणि अर्थ समजून घ्या
एखाद्या शब्दाचा किंवा आवडत्या कवितेतील काही ओळींचा टॅटू पाहिजे असेल तर सर्वप्रथम स्पेलिंग बरोबर आहे का नाही हे तपासून बघा. चुकीची स्पेलिंग असणारा टॅटू म्हणजे सगळी मेहनत वाया. तसेच शब्दांचा अर्थसुद्धा डिक्शनरीमध्ये पाहून समजून घ्या.
२. भविष्याचा विचार करून डिझाईन निवडा
उत्साहाच्या भरामध्ये टॅटू गोंदवून घेऊ नका. पर्मनंट टॅटू असेल तर डिझाईन निवडताना दहा वेळा विचार करा. समजा आज तुम्हाला मिकी माऊसचा टॅटू कूल वाटत असेल; परंतु उतारवयामध्ये मित्रांना तुम्हाला चिडविण्यासाठी त्यामुळे आयते कारणच मिळू शकते, हे विसरू नका.
३. दर्शनीय भागावर टॅटू नका काढू
काही खाजगी गोष्टींबद्दलचा टॅटू सर्वांना दिसेल असा काढू नका. किंवा डिझाईनबद्दल तुम्ही शंभर टक्के नि:शंक नसाल तर मग मानेवर किंवा इतर सहज नजरेत न पडणार्‍या शरीरभागावर टॅटू काढणे हा सवरेत्तम पर्याय आहे.
४. अतिउत्साही होऊन टॅटू गोंदवू नका
सगळे मित्र काढताहेत म्हणून आपणही टॅटू काढावा असे असेल तर हे बरोबर आहे का, याचा शांत डोक्याने विचार करा. अतिउत्साही होऊन नंतर पश्‍चताप होईल असा टॅटू नका गोंदवून घेऊ. टॅटूची जागा, रंग, आकार, डिझाईन या सर्व बाबींचा योग्य विचार करूनच तो गोंदवा.
५. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचे नाव नकोच!
cnxoldfiles/बॉयफ्रेंडचे नाव गोंदवून घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थांबा! उद्या जर ब्रेक -अप झाले तर टॅटूमुळे आयुष्यभर पश्‍चाताप सहन करावा लागू शकतो.

Web Title: Do not forget these 5 things while removing the tattoo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.