Alert : ​आॅनलाइन अफेयरमुळे वैवाहिक आयुष्य धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 11:36 AM2017-11-23T11:36:08+5:302017-11-23T17:11:07+5:30

चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरकरणी हार्मलेस वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.

Alert: The threat of marital life due to the online impact! | Alert : ​आॅनलाइन अफेयरमुळे वैवाहिक आयुष्य धोक्यात !

Alert : ​आॅनलाइन अफेयरमुळे वैवाहिक आयुष्य धोक्यात !

Next
शल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा परिणाम आपल्या खाजगी आयुष्यावर जाणवायला लागला आहे. विशेष म्हणजे काही चित्रपटांमध्येही याचे धोके दाखविण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणास जरी तात्पूरता आनंद मिळतो मात्र यांचे भयंकर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यात घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता, चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. त्याऐवजी एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं. असे केल्यास वैवाहिक आयुष्याचा खरा आनंद मिळू शकातो. चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात.  मात्र वरकरणी हार्मलेस  वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.

बऱ्याचजणांना आॅनलाइन चॅटिंग करुन आपल्या पार्टनरची फसवणूक करण्याचे थ्रिल वाटते. विशेष म्हणजे असा प्रकार करत असताना व्यक्ती ही कॉम्पुटरच्या मागे सुरक्षित असते त्यामुळे तिच्यात एक फाजील धाडस आलेलं असतं. ‘इतर जे करतात ते मीही करू शकतो. मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. ज्यांच्यात व्हर्च्युअल करेज-धाडस निर्माण होतं ते असे प्रकार करतात; पण हे खर धाडस नाही. याच्यातून आपले वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. सायबर चीटिंग हे व्हर्च्युअल  वर्ल्डमध्येच होतं आणि यात जे भावनिकरीत्या गुंतलेले असतात त्यांना स्वत:च वागणं चुकीचं, अप्रामाणिक वाटत नाही.

‘मी काही कोणाला प्रत्यक्षात बघत नाही किंवा सोअर्स करत नाही ती फसवणूक कशी होईल’, असा युक्तिवाद ते करतात. विशेष म्हणजे ती फसवणूकच असते. जर दोन व्यक्तींचं नातं कसं असावं याचे काही नियम असतील तर ते सायबरवरही पाळायला हवेत. वास्तव आणि आभासी अशी आपल्या जीवनाची विभागणी झालेली नाही. तुमची निष्ठा हि सगळीकडे असायला हवी. माणसाचं व्यक्तिमत्व हे संमिश्र आहे. त्यामुळे फसवणूक चुकीचीच आहे. 

आजकाल पती -पत्नी किंवा पार्टनर्स  हे बरेचदा आॅनलाइन बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यातून त्याचा भावनिक संपर्क तुटतो. याचा परिणाम नात्यावर होतो.  स्वत:च्या पार्टनरमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले का नाहीत हा खरा प्रश्न आहे. जर केअच नात्यात तुम्ही मनाने गुंतलात तर आॅनलाईन भटकंतीची गरजच भासणार नाही. आॅनलाईन  चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत.  घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं.

Web Title: Alert: The threat of marital life due to the online impact!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.