विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:26 AM2018-09-14T05:26:30+5:302018-09-14T05:27:50+5:30

‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ हा विचार अप्पा कारमरकर यांच्या मनात पक्का रुजला आहे.

farmer earns lakhs of rupees from poison free farming | विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न

विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न

Next

- नारायण चव्हाण, सोलापूर />
रासायनिक खतांमधील विष अन्नधान्यात उतरून समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, हा प्रमुख उद्देश समोर ठेवत मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पा कारमरकर यांनी विषमुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला. रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न कारमरकर यांनी घेतले आहे. शेतीतील त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय ठरत आहे.
पदवीधर असलेल्या आप्पा कारमकर यांचा शेतीविषयक अभ्यास चांगला आहे. परिसरातील प्रगतिशील शेतकºयांशी त्यांचा नित्याचा संपर्क असतो. यातूनच त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. अनगरसारख्या दुष्काळी भागात नेहमीच निसर्गाची अवकृपा असते. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करीत कारमरकर यांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारी पिके निवडली. ‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला आहे.
विषमुक्त शेतीचा ध्यास घेऊन कारमरकर सध्या काम करीत आहेत. त्यांनी शेवगा शेतीचा अवलंब केला. ‘ओडीसी’ जातीच्या वाणाची निवड केली. एक एकर जमिनीत शेवग्याची लागवड केली. अग्निज्वाला मिरची आणि झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड केली. तत्पूर्वी शेणखताचा वापर केला. गांडूळ खत, जीवामृताची शेतातच निर्मिती करून त्याचा पिकासाठी वापर सुरू केला. त्यासाठी त्यांना फारसा खर्च करावा लागला नाही. मात्र कष्ट जास्त करावे लागले. विषमुक्त शेतीमुळे खर्चात बचत होते, उत्पादनात वाढ होते, सुपिकता कायम राहते, हे ध्यानात घेऊन कारमरकर यांनी विषमुक्त शेतीलाच पसंती दिली.
फवारणीसाठी जीवामृत
देशी गायीचे गोमूत्र एक मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्यामुळे मावा थ्रिप्स बुरशी नाहीशी होते. दर १५ दिवसांनी पाच किलो काळा गूळ २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येते. त्यामुळे पिकाला कॅल्शियम मिळते.
घरीच तयार केले जाते द्रावण
एक लिटर तांदळाची पेज, २५० ग्रॅम दही, १०० ग्रॅम मीठ, १०० ग्रॅम काळा गूळ याचे मिश्रण करून सात दिवस अंधाºया खोलीत ठेवले जाते. सकाळ-संध्याकाळ मिश्रण ढवळणे व सात दिवसानंतर म्हणजे एक लिटर पाण्यात ५ मि.लि. द्रावण मिसळून फवारणी केली. यामुळे अळी, थ्रिप्स नाहीसे होतात. या द्रावणाच्या निर्मितीसाठी गोपालन करून विषमुक्त शेती करता येते.
नाममात्र खर्च आणि उत्पन्न दीड लाखाचे
अप्पा कारमरकर, त्यांच्या मातोश्री भामाबाई, पत्नी प्रियंका हे तिघेही स्वत: शेतीत कष्ट घेतात. गरजेनुसार रोजंदारीवर एखादा मजूरही लावतात; परंतु या शेतीचा खर्च तसा अत्यल्प असतो. खर्चवजा जाता दीड लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. यापूर्वी त्यांनी तीन एकर जमिनीत शेवग्याची लागवड केली होती. त्यांना १५ लाखांचे विक्रमी उत्पादन मिळाले, असे त्यांनी सांगितले.

Web Title: farmer earns lakhs of rupees from poison free farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.