थोरले काका म्हणाले, ‘एक व्हा!’

By सचिन जवळकोटे | Published: June 7, 2018 03:02 AM2018-06-07T03:02:36+5:302018-06-07T06:34:02+5:30

थोरले काका बारामतीकरांनी तमाम विरोधकांना ‘एक व्हाऽऽ’ चा नारा देताच सारे नेते खडबडून जागे झाले. ज्यांची सारी जिंदगानी पार्टी तोडण्या-फोडण्यातच गेली, ते ‘एकीची भाषा’ करताहेत, हे पाहून अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी वाढल्या.

 The eldest uncle said, 'Be one!' | थोरले काका म्हणाले, ‘एक व्हा!’

थोरले काका म्हणाले, ‘एक व्हा!’

googlenewsNext

थोरले काका बारामतीकरांनी तमाम विरोधकांना ‘एक व्हाऽऽ’ चा नारा देताच सारे नेते खडबडून जागे झाले. ज्यांची सारी जिंदगानी पार्टी तोडण्या-फोडण्यातच गेली, ते ‘एकीची भाषा’ करताहेत, हे पाहून अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी वाढल्या. गुफ्तगू सुरू झालं.
जळगावचे गिरीशभाऊही छगनरावांना भेटले. दोघांच्या भेटीत म्हणे झिजलेल्या मफलराचा अन् वाढलेल्या दाढीचा विषय निघाला. ‘बारामतीच्या धाकट्या दादांची नजर लागल्यानंच माझे स्ट्रॉँग आर्म वीक झाले,’ असं म्हणे छगनरावांनी तळतळून सांगितलं. मात्र, त्यांच्या भूतकाळाशी देणं-घेणं नसलेल्या ‘कमळ’वाल्यांना फक्त स्वत:च्याच भविष्याची काळजी असावी. ‘धनुष्यबाणापेक्षा कमळाशी जवळीक कशी फायद्याची ठरू शकते,’ हे गिरीशभाऊंनी पटवून दिलं. काकांनी दिलेल्या ‘एकी’चा सल्ला आठवून छगनरावांनीही मान हलविली.
दुसरीकडं विनोदभाऊही ‘कृष्णकुंज’वर ‘राज’ना भेटले. नेहमीच्या ठसक्यात ‘राज’नी विचारलं, ‘आता ही कुठली तुमची नवी नाटकं?’ तेव्हा विनोदभाऊ हसत उत्तरले, ‘खऱ्याखुºया नाट्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला आलोय, कारण नाटकात तुमचा हात आम्हीही धरू शकत नाही. तुम्ही त्यात भलतेच माहीर ना.’ तेव्हा आपण सारेच नौटंकी करण्यात ‘एक’ आहोत, याचा साक्षात्कार उपस्थितांना झाला.
तिसरीकडं अमितभाईही ‘मातोश्री’वर उद्धोंना भेटले. त्यांना पाहून उद्धो गरजले, ‘खामोशऽऽ’ आता आमची मुस्कटदाबी सहन करण्यापलीकडं गेलीय.’ अमितभाई गोंधळले. त्यांनी आपल्या सहकाºयाला विचारलं, ‘येटले सू?’ सहकाºयानं कानात सांगितलं, ‘एकीकडं तोंडात कारल्याची भाजी कोंबायची अन् दुसरीकडं विचारायचं, मिठाई खाणार का? यालाच म्हणतात मुस्कटदाबी.’ हे ऐकताच अमितभाई गालातल्या गालात (दाढीतल्या दाढीत) हसले. त्यांनी दिलखुलासपणे उद्धोंना विचारलं, ‘फापडा अने जलबी खासो से?’... हे ऐकताच ‘मातोश्री’वर ठामपणे ‘एक’मत झालं की जखमेवर मीठ चोळण्यासाठीच भाई आलेत.
‘काकांचा सल्ला मानत इतर नेते एक होताहेत, मग आपल्या पक्षातील नेते कधी एकत्र येणार,’ असा भाबडा प्रश्न एका ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्याला पडला. सोलापुरात विजयदादा अन् बबनदादा असो. कोल्हापुरात मुन्ना अन् मुश्रीफ असो. साताºयात थोरले अन् धाकटे राजे असो. या साºयांचीच तोंडं नेहमी दोन दिशेला. तेव्हा या कार्यकर्त्यानं घाबरत घाबरत साताºयात थोरले राजेंना विचारलं, ‘महाराज... तुम्ही अन् धाकटे दादा कधी एकत्र होणार?’ तेव्हा कॉलर उडवत राजे गरजले, ‘अगोदर काका अन् दादा तर खरंखुरं एक होऊ देत.’ कार्यकर्ता गपगुमानं बाहेर.
इकडं ‘हात’वाल्यांच्या भवनातही अनेक नेतेमंडळी कधी नव्हे ती एकत्र आलेली. अनेक तास त्यांच्यात गहन चर्चा रंगलेली. खलबतं झडू लागलेली. अनेकांच्या हातात शब्दकोश अन् डिक्शनरी. कुणी मोबाईलवर गूगल ओपन करून बसलंय तर कुणी फोनवरून मराठी प्राध्यापकांशी संवाद साधतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सारी मंडळी याच कामात व्यस्त राहिली; परंतु शेवटपर्यंत काही त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलंच नाही, ‘एक होणं म्हणजे काय?’ कारण आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात भांडून भांडून ही मंडळी म्हणे ‘एकी’ची प्रक्रियाच विसरून गेलेली.


(तिरकस)

Web Title:  The eldest uncle said, 'Be one!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.