राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला शिकविले - एकनाथराव खडसे
By Admin | Updated: May 19, 2017 18:46 IST2017-05-19T18:32:12+5:302017-05-19T18:46:39+5:30
पलटवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला.

राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला शिकविले - एकनाथराव खडसे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - राजकारणात आपण अनेकांना नाडय़ा बांधायला शिकविले. आपणास कर्तृत्त्व सांगायची गरज नाही, असा पलटवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाच्या महानगर विभागाच्या विस्तारक वर्गात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी कुणाचेही नाव न घेता ‘सगळे माङयामुळेच झाले.असे म्हणण्याचे दिवस गेले.’ अशा कानपिचक्या दिल्या होत्या. या विषयाचा समाचार घेत खडसे हे कुणाचेही नाव न घेता म्हणाले, कर्तृत्त्ववान माणसाला त्याचे कर्तृत्त्व सांगण्याची गरज नसते. ज्याचे कर्तृत्त्व नाही, त्याला प्रसिद्धी करून ते सांगावे लागते. मी काय आहे, काय केले हे शेंबडे पोरही सांगेल. राजकारणात अनेकांना नाडय़ा बांधायला शिकविल्या तेच आज बोलत आहेत. तापी पाटबंधारे महामंडळाचा निर्णय, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयटीआय यासारखे अनेक जनहिताचे निर्णय घेतले ते सर्वाना माहित आहे. मला कर्तृत्त्व सांगण्याची गरज नाही, असे खडसे म्हणाले.