पैशांअभावी उपचार थांबवू नयेत!, गरजूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:52 IST2017-12-26T04:52:26+5:302017-12-26T04:52:50+5:30
धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

पैशांअभावी उपचार थांबवू नयेत!, गरजूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे
धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुरू आहेत. गरीब रुग्णांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.
खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन आणि राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. शासनातर्फे राज्यात १ कोटी लोकांचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी स्कॅनिंग करण्यात आले. त्यात कॅन्सर पहिल्या टप्प्यात असलेले अनेक रुग्ण आढळून आले. १३ तरुणांना व्यसनाधिनतेमुळे कॅन्सर झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनेनंतर तरी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.