निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्या त्रिकुटाला  अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 07:06 PM2019-06-04T19:06:27+5:302019-06-04T19:07:21+5:30

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Trio who stole a retired ACP pistol, was arrested | निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्या त्रिकुटाला  अटक

निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्या त्रिकुटाला  अटक

Next
ठळक मुद्देतोष ऊर्फ जय प्रदीप संभरकर (३१), बाबू जमालुद्दीन खान (३५) आणि गणेश उर्फ मामा वैद्य (४७) अशी अटक आरोपींची नावं आहेत. आरोपींनी इतरांना धाक दाखवण्यासाठी ती चोरल्याचं सांगितलं जात आहे. 

 

मुंबई - सायन परिसरात राहणाऱ्या निवृत्त एसीपीच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसून हाती लागलेल्या पिस्तुलीच्या धाकावर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सायन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संतोष ऊर्फ जय प्रदीप संभरकर (३१), बाबू जमालुद्दीन खान (३५) आणि गणेश उर्फ मामा वैद्य (४७) अशी अटक आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मानखुर्द परिसरात राहणारा संतोष संभरकर हा लिफ्ट दुरूस्तीचं काम करतो. हे काम करताना आसपासच्या इमारतीत कुठल्या खोल्या रिकाम्या आहेत, त्याची माहिती तो बाबू खानला द्यायचा. त्यानंतर हे तिघं संबंधित ठिकाणी घरफोडी करायचे. काही दिवसांपूर्वी सायन परिसरात राहणारे किर्तीकुमार करंजे (५१) यांच्या घरी या टोळीने चोरी केली. त्यावेळी चोरट्यांनी तिजोरीतील १ लाख ८५ हजार रुपयांच्या दागिन्यांसह करंजे याच्या दिवंगत वडिलांची पिस्तुल आणि ४२ जिवंत काडतुसंही चोरली. करंजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. चोरांनी तिजोरीतून दिवंगत वडिलांची परवाना असलेली पिस्तुलही चोरल्याचं उघडकीस आलं. कंरजे यांचे वडील निवृत्त एसीपी होते. या पिस्तुलीचा दुरूपयोग होऊ नये, म्हणून करंजे यांनी सायन पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर, पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवली. सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागश्री मुळीक यांनी तपासाला सुरूवात केली. स्थानिक खबऱ्यांच्यामार्फत त्यांनी मिळालेल्या माहितीवरून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ती रिव्हॉल्वरचा परवाना करंजे यांच्या वडिलांच्या नावावर होता. या रिव्हॉल्वरमधील पीन काढण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यापासून धोका नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपींनी इतरांना धाक दाखवण्यासाठी ती चोरल्याचं सांगितलं जात आहे. 

Web Title: Trio who stole a retired ACP pistol, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.