हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:35 PM2018-11-14T18:35:23+5:302018-11-14T18:36:02+5:30

शहरात बुधवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

A total of nine and a half lakhs gutkha seized in Hinjawadi and Chikhali areas | हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त

हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त

ठळक मुद्देचिखली, तसेच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकची ही संयुक्त कारवाई

पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ७१ हजार १३२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर चिखली येथे २ लाख ३७ हजार रुपयांचा किंमतीचा गुटखा जप्त केला. शहरात बुधवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा साठा हिंजवडी हद्दीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने हस्तगत केला. गुटख्याचा साठा केलेल्या गोदामातील माल हिंजवडी हद्दीत पकडण्यात आला.गुटख्याच्या साठ्यासह आरोपी समीर युनूस तांबोळी (वय ४५,रा. थेरगाव) यास ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजवडी पोलिसांनी बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी आरोपी तांबोळी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.गुन्ह्यात वापरलेले वाहनसुद्धा जप्त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी संतोष सावंत सहायक आयुक्त आर. काकडे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
चिखली येथे अशाच प्रकारची कारवाई गुन्हे शाखा युनिट एक तसेच चिखली, आळंदी पोलीस यांच्यावतीने करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रविंद्र जेकटे यांनी बेकायदा गुटखा वाहतुक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सचिन गंगाधर पाटील (वय २८,रा.मालेगाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मुद्देमाल घेऊन जात असताना, देहु -आळंदी रस्ता येथे ही कारवाई करण्यात आली. चिखली, तसेच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकची ही संयुक्त कारवाई होती. असे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले. 
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन,  अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ,पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: A total of nine and a half lakhs gutkha seized in Hinjawadi and Chikhali areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.