साडेसात लाख रुपयांच्या रकमेसह तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:59 PM2018-11-10T20:59:21+5:302018-11-10T21:11:54+5:30

शिवाजी नगर पोलिसांची कारवाई: नोटा बनावट असल्याचा संशय

Three arrested with a sum of Rs. 750,000 | साडेसात लाख रुपयांच्या रकमेसह तिघांना पकडले

साडेसात लाख रुपयांच्या रकमेसह तिघांना पकडले

ठळक मुद्दे पोलिसांना बॅगमध्ये साडेसात लाखरूपयांच्या कोऱ्या नोटांच्या बंडलांसह पांढºया रंगाचा लॅपटॉप, टूलकिट, तीन मोबाईल आदी साहीत्य मिळून आले.

खामगाव :  साडेसात लाख रुपयांच्या नकली नोटा संशयास्पदरित्या घेवून जाणाऱ्या तिघांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता चिखली बायपासवरील एका धाब्यावर करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसमधून तिघेजण संशयास्पदरित्या साडेसात लाख रुपयांच्या नोटा घेऊन जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून जाणाºया तीन एसटी बसची झडती घेतली. बुलडाणा येथून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच १४-४७५२ या बसमधून मो. तौकीर शे. जमीर (रा. पातूर), नसीरखान बशीर खान (रा. जालना), अफजल खान बशीर खान (रा. जालना) या तिघांना संशयास्पदरित्या पकडण्यात आले. त्यानंतर तिघांनाही शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. यावेळी पोलिसांना बॅगमध्ये साडेसात लाखरूपयांच्या कोऱ्या नोटांच्या बंडलांसह पांढºया रंगाचा लॅपटॉप, टूलकिट, तीन मोबाईल आदी साहीत्य मिळून आले. पोलिसांनी पकडलेल्या नोटा नकली असल्याचा प्राथमिक अंदाज असून, नोटांच्या तपासणीसाठी बँकेतील अधिकाºयांना पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात  ही कारवाई पीएसआय अतुल सुरवाडे, हे.कॉ. किरण राऊत, रमेश भामोदकर, रफीक शाह, चंद्रप्रकाश इंगळे, गोविंद नेमणार, संतोष मुंजाळ, दिनकर राठोड, प्रदीप वानखडे आदींनी केली.


तीन बसची झाडाझडती!

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन बसची झाडाझडती घेतली. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया पहिल्या दोन बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, तिसºया बसमध्ये उपरोक्त तिघे संशयास्पद रित्या आढळून आले. 


 साडेसात लाख रुपयांची रक्कम घेवून जाणाºया तिघांना एसटी बसमधून ताब्यात घेतले आहे. संशयास्पदरित्या हालचालींमुळे पकडण्यात आलेल्या नोटा नकली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नोटांची तपासणी करण्यासाठी बँक अधिकाºयांना बोलाविले आहे. पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव.

Web Title: Three arrested with a sum of Rs. 750,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.