मुंबईच्या ओव्हल मैदानात तरुणीचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 08:22 PM2018-07-31T20:22:30+5:302018-07-31T20:23:06+5:30

बेपत्ता नसरीनला शोधण्यास आलेला प्रियकर सलमानच निघाला आरोपी

Suspicion of the body of the girl killed in the Oval grounds of Mumbai, unilateral love | मुंबईच्या ओव्हल मैदानात तरुणीचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

मुंबईच्या ओव्हल मैदानात तरुणीचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

googlenewsNext

मुंबई - चर्चगेट येथील ओव्हल मैदानात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुर्ला येथील एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह ओव्हल मैदानात आढळून आल्याने खळबळ माजली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जी. टी. रुग्णालयात पाठवून दिला. मात्र पोलीस तपासत जखमी अवस्थेत सापडलेल्या मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने भोसकून तिचा खून केल्याचे निष्पन्न होत होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर घरी न परतलेल्या नसरीनचा शोध घेत तिच्या वडिलांसोबत आलेल्या सलमानला पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात प्रेमप्रकरणातून हि हत्या केली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

काल नेहमीप्रमाणे नसरीन ऑफिससाठी सकाळी ८ वाजता निघाली होती. नसरीन चाय पे चर्चा या कॅफेत नोकरी करत होती. मात्र, काल सायंकाळी ती ऑफिसहून घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी तिच्या प्रियकराकडे विचारपूस केली. त्यावेळी प्रियकर असलेल्या सलमानने काहीच माहित नसल्याचे सांगितले. नसरीनचे वडील उमर मोहम्मद शेख आणि प्रियकर सलमान शेख हे दोघे मिळून आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास फोर्ट परिसरात नसरीनचा शोध घेण्यास आले असता ओव्हल मैदानाजवळ पोलिसांची गर्दी दिसली. त्यांनी पोलिसांजवळ पाहणी केली असता नसरीनचा मृतदेह असल्याची माहिती त्यांना मिळाला. तिच्या पोटावर आणि शरीरावर चाकूने भोसकल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यानंतर मुलीच्या  वडिलांनी मुलीचा खून झाला असून तो प्रियकर सलमानने केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. त्यावरून याप्रकरणी आरोपीला सलमानला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Suspicion of the body of the girl killed in the Oval grounds of Mumbai, unilateral love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.