शाब्बास! पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:24 PM2019-06-04T16:24:28+5:302019-06-04T16:30:23+5:30

इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत भारताला मिळवून दिले ४ सुवर्ण पदके

Shabbas! Police constable Ritesh Prajapati created proud moment for tricolor in Sri Lanka | शाब्बास! पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा

शाब्बास! पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा

Next
ठळक मुद्दे स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. श्रीलंकेत तिरंग्याचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांना "लोकमत"चा सलाम. 

वसई - पालघर पोलीस दलाच्या मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रितेश दिनेश प्रजापती यांनी १७ व्या टेनशिप कप इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून ४ सुवर्ण पदके पटकावली आहेत. ही स्पर्धा श्रीलंका देशात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. 
फस्ट मेन ओपन काता, फस्ट मेन ओपन कृमितो, फस्ट मेन ओपन टीम काता, फस्ट मेन ओपन टीम कृमितो या स्पर्धा प्रकरात पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी ४ सुवर्ण पदके पटकावले. या उत्तम कामगिरीबद्दल पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. श्रीलंकेत तिरंग्याचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांना "लोकमत"चा सलाम. 

Web Title: Shabbas! Police constable Ritesh Prajapati created proud moment for tricolor in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.