मुंब्य्रातील अपहृत बाळाचा शोध सुरूच, फुटेजची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:34 AM2019-02-06T03:34:18+5:302019-02-06T03:34:30+5:30

मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान अब्दुल खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही.

Search for kidnapped kidnapped child in Mumbra, footage verification | मुंब्य्रातील अपहृत बाळाचा शोध सुरूच, फुटेजची पडताळणी

मुंब्य्रातील अपहृत बाळाचा शोध सुरूच, फुटेजची पडताळणी

Next

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान अब्दुल खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेला ४८ तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. मुंब्रा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या चार ते पाच पथकांनी सोमवारी दिवसभरात अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. मात्र, शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनीही चिंता व्यक्त केली.
मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार देतेवेळी मुलाचे वडील अब्दुल खान यांच्या मेहुण्याची मुलगी सोनिया (९) हिने आधी एका रिक्षातून आलेल्या व्यक्तीने मुलाला तिच्या ताब्यातून घेऊन गेल्याची माहिती दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या चौकशीत मात्र तिने एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने दहा रुपये देऊन कबाब पाव आणण्यास सांगितले. त्यानंतर ती मुलाला घेऊन गायब झाल्याची माहिती दिली. दोन वेगवेगळी विधाने या मुलीने केल्यामुळे पोलिसांच्या तपासातही अडथळा आला. शिवाय, मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील आणि मस्जिदसमोरील सीसीटीव्ही बंद आढळले. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही चारही पथकांनी पडताळले. ४० ते ५० जणांची चौकशीही केली. मात्र, या महिलेची माहिती अद्याप मिळाली नाही. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणाला आता ४८ तास उलटूनही काहीच धागादोरा हाती न लागल्यामुळे या मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार मुंब्रा आणि गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्याने दोन्ही पथकांकडून तपास सुरु आहे.

या प्रकरणात तक्रार दाखल करताना एका रिक्षा चालकाने सलमानला नेल्याचे सोनियाने सांगितले होते. नंतर तिने एका बुरखा परिधान केलेल्या महिलेने त्याला नेल्याचे सांगितले. वेगवेगळया माहितीमुळे गोंधळ निर्माण झाला होता. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तीन पथकांची निर्मिती केली आहे. सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.
- किशोर पासलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे

Web Title: Search for kidnapped kidnapped child in Mumbra, footage verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.