काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या याचिकांवर हायकोर्टात होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:07 PM2022-03-21T17:07:19+5:302022-03-21T17:07:38+5:30

1998 Blackbuck poaching case : सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या  न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत.

Salman Khan's petitions in blackbuck poaching case to be heard in High Court | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या याचिकांवर हायकोर्टात होणार सुनावणी

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या याचिकांवर हायकोर्टात होणार सुनावणी

Next

१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली आहे. अभिनेत्याशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या  न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला ६ दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते.

त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमान खान व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.

Web Title: Salman Khan's petitions in blackbuck poaching case to be heard in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.