पळवून नेवून महिलेवर बलात्कार, एमआयएमच्या निलंबित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 08:22 AM2019-05-13T08:22:47+5:302019-05-13T08:31:48+5:30

एका महिलेस ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाची धमकी दाखवून खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग केला, तर बारामती, औरंगाबाद येथे ठिकठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली

Rape after taking the woman away from the entire City of Khorwadi | पळवून नेवून महिलेवर बलात्कार, एमआयएमच्या निलंबित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

पळवून नेवून महिलेवर बलात्कार, एमआयएमच्या निलंबित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

Next

चाकण  - खराबवाडी ( ता.खेड ) येथील सारा सिटीमधून एका महिलेस ओळखीचा गैरफायदा घेऊन पिस्तुलाची धमकी दाखवून खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग केला, तर बारामती, औरंगाबाद येथे ठिकठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तर आरोपीचा भाऊ व मेव्हुणा यांनी पीडित महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आरोपी एमआयएमचा माजी नगरसेवक असल्याचे समजते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेनऊ ते २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खंडाळा येथील वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेन्सी बारामती, टाऊन हॉल औरंगाबाद, गिरीजा हॉटेल लॉज शरणापूर फाट्याजवळ औरंगाबाद, औरंगाबाद हर्सूल येथील एका घरात वेळोवेळी घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मतीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, आसफिया कॉलनी, जयभीम नगर, औरंगाबाद ), हामेद सिद्धकी ( रा. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद - मतीनचा मेव्हुणा ) व मोहसीन रशीद सय्यद ( रा. टाऊन हॉल, औरंगाबाद - मतीनचा भाऊ ) या तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक शिंदे मॅडम पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Rape after taking the woman away from the entire City of Khorwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.