पुलवामा हल्ला, काशिमिरातील स्फोट, रायगडात सापडलेल्या बॉम्बनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 09:11 PM2019-02-22T21:11:15+5:302019-02-22T21:13:37+5:30

मुंबईनजीक अशा दोन घटना घडल्याने संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Pulwama attack, explosion in Kashimir, Raigad bomb found in Maharashtra after High alert! | पुलवामा हल्ला, काशिमिरातील स्फोट, रायगडात सापडलेल्या बॉम्बनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट !

पुलवामा हल्ला, काशिमिरातील स्फोट, रायगडात सापडलेल्या बॉम्बनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट !

ठळक मुद्देमुंबईतील रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकं, मेट्रो रेल्वे, मुंबईतली गर्दीची ठिकाणं, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. काशिमिरा येथील मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखीत केला आहे.

मुंबई - मिरा - भाईंदर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील काशिमीरा ठाकूर मॉलजवळ नुकताच स्फोट झाला आहे. स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके दाखल झाली. एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर प्लास्टिकचा बॉल फेकल्याने त्याचा स्फोटा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तर त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कर्जत-आपटा एसटी बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता कंडक्टरला एसटी बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. मुंबईनजीक अशा दोन घटना घडल्याने संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

एसटी बसमध्ये ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला. या घटनेनंतर रायगडजिल्ह्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्जतहून आलेली एसटी क्र मांक एम एच १४, बीटी १५९६ आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या घटना उघडकीस आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून पाहारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने देखील सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला अनोळखी संशयास्पद वस्तू आढळली तर संबंधित पोलिसांना कळवा. 

मुंबईतील रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकं, मेट्रो रेल्वे, मुंबईतली गर्दीची ठिकाणं, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. याआधीही मुंबईतल्या लोकलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. काशिमिरा येथील मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखीत केला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी या दोन्ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. सगळ्याच ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Web Title: Pulwama attack, explosion in Kashimir, Raigad bomb found in Maharashtra after High alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.