नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:25 PM2019-03-20T14:25:35+5:302019-03-20T14:26:58+5:30

नालासोपारा शहरात खळबळ उडाली.

Prime minister photo viral on facebook | नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल

नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल

Next
ठळक मुद्देराजेश पाल (२४) या तरुणाच्या फेसबुक अकाउंटवर सोमवारी मोदी यांचे असे फोटो मोहम्मद आसिफ नजीर, अवेकन इंडिया आणि आमीन लाघिरी या तीन फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आले.यासंदर्भात राजेश पाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा - पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्याने सोमवारी नालासोपारा शहरात खळबळ उडाली. तुळींज पोलिसांनी ते अपलोड करणाऱ्या तिघांविरोधात आणि एकाने शेअर केले म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
राजेश पाल (२४) या तरुणाच्या फेसबुक अकाउंटवर सोमवारी मोदी यांचे असे फोटो मोहम्मद आसिफ नजीर, अवेकन इंडिया आणि आमीन लाघिरी या तीन फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आले. तर साबीर-साबीर या अकाउंटधारकाने ते फोटो शेअर केले. यासंदर्भात राजेश पाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Prime minister photo viral on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.