पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणारे पोलिसांना सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:07 IST2018-10-15T15:06:05+5:302018-10-15T15:07:30+5:30
या अज्ञात हल्लेखोरांच्या गावदेवी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याचा या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता याचा पोलीस तपस करत आहेत.

पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणारे पोलिसांना सापडले
मुंबई - एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला बेदम मारहाण करणाऱ्या चार जणांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्रकार हर्मन गोम्स मित्राच्या घरून घरी जाण्यास निघाला असताना त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हर्मनवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हर्मनच्या उजव्या डोळ्याला आणि हाताला गंभीर दुभापात झाली असून सहा टाके पडले आहेत. याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात हर्मनने अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या अज्ञात हल्लेखोरांच्या गावदेवी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याचा या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता याचा पोलीस तपस करत आहेत.