हरवलेल्या चिमुकलीचा पोलिसांकडून 12 तासात शोध; पोलिसांच्या अनोख्या भेटीसह आईकडे केले स्वाधीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 09:44 PM2018-11-03T21:44:02+5:302018-11-03T21:44:27+5:30

कळवा स्थानक व तेथून कुर्ला स्थानकावर पोहचली. दरम्यान कळवा पोलिसांनी चिमुकलीचा कसून शोध घेत तिला अवघ्या 12 तासाच्या आता शोधून काढले व तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले.

Police searched for missing dogs in 12 hours; With unique gift of the police, done with his mother | हरवलेल्या चिमुकलीचा पोलिसांकडून 12 तासात शोध; पोलिसांच्या अनोख्या भेटीसह आईकडे केले स्वाधीन 

हरवलेल्या चिमुकलीचा पोलिसांकडून 12 तासात शोध; पोलिसांच्या अनोख्या भेटीसह आईकडे केले स्वाधीन 

googlenewsNext

ठाणे - कळवा परिसरातून  ७ वर्षाची वैष्णवी संतोष सांगवेकर ही चिमुकली गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातून हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी अवघ्या १२ तासात या चिमुकलीचा शोध घेऊन तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला हवे असलेले नवीन कपडे खरेदी करून देऊन कुटुंबीयांकडे स्वाधीन केले.

घोलाई नगर येथे राहणाऱ्या पूजा संतोष सांगवेकर या महिलेने आपली बहीण वैष्णवी हरविल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत चिमुकलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी कळवा पोलिसांनी 4 पथक नियुक्त करून मुलीचा परिसरात व रेल्वे स्थानकावर कसून शोध सुरु केला होता. ही मुलगी नियमितपणे वावरत असलेल्या ठिकाणी तपास करण्यात आला तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. चिमुकली राहत असलेल्या ठिकाणापासून ते कळवा रेल्वे स्टेशनपर्यंत आणि आजूबाजूच्या परिसरातील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासून पहिले. या पैकी एका सीसीटीव्हीत हरवलेली मुलगी कळवा स्थानकातून कुर्लाकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही मुलगी कुर्ला रेल्वे स्टेशन येथे असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार त्वरित पोलिसांचे पथक कुर्ला रेल्वे स्टेशन येथे पाठवण्यात आले. तेथील लोकांनी पोलिसांना हरवलेली मुलगी खूप रडत असल्यामुळे तिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने मानखुर्द बालसुधारगृहामध्ये दाखल केले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी सुधारगृहात जाऊन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की ती बहिणीकडे राहते, तिला नवीन कपडे हवे होते म्हणून ती स्वतःच आईकडे कपडे घेण्यासाठी म्हणून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती कळवा स्थानक व तेथून कुर्ला रेल्वे स्थानकावर पोहचली. दरम्यान कळवा पोलिसांनी चिमुकलीचा कसून शोध घेत तिला अवघ्या 12 तासाच्या आता शोधून काढले व तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले.

Web Title: Police searched for missing dogs in 12 hours; With unique gift of the police, done with his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.