कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 07:44 PM2018-07-30T19:44:52+5:302018-07-30T19:45:33+5:30

वृद्धेस चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून केली होती लाखोंची चोरी

Police arrested who robbed old age lady by becoming a courier boy | कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक 

कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक 

Next

मीरारोड - कुरियरच्या बहाण्याने घरात घुसून वृद्धेस चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून दागिने - रोख असा ३ लाख ३५ हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या दोघा आरोपीना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काशिमीरा युनिटने अटक केली आहे . विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा वृद्धेच्या कुटुंबीयांचा परिचित असून मुळचे एकाच अलाहाबाद भागातले आहेत . 

या बाबत माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम म्हणाले कि , २३ जुलै रोजी दुपारी मीरारोडच्या गौरव व्हॅलीतल्या आर्चिड इमारतीत राहणाऱ्या पुष्पा शुक्ला (७०) ह्या घरात एकट्याच होत्या . त्यावेळी कुरियर वाले असल्याचे सांगून तोंड रुमालाने झाकलेल्या दोन अनोळखी तरुणांनी घरात प्रवेश करत पुष्पा यांना चाकूचा धाक दाखवला . त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली . त्या नंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने , घड्याळे , रोख असा ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला . त्यांची सून कामावरून परतली तेव्हा घडला प्रकार लक्षात येताच मुलगा विक्रमने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  

 तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी सदर गुन्हा गांभीर्याने घेत गुन्हे शाखे कडे तपास सोपवला .  सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख , उपनिरीक्षक श्रीकांत करांडे , अभिजित टेलर सह वेळे , वाडिले , गर्जे , पोशिरकर , थापा , जाधव , टक्के आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज धुंडाळले असता दहिसर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपींची ओळख पटली . व अन्य तांत्रिक विश्लेषणाने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली . अविनाशकुमार रवींद्रकुमार शुक्ला ( २६) रा . महेश्वरी नगर , अंधेरी एमआयडीसी व देवेंद्र उर्फ दीपेश भगवान अटके ( १९ )  रा . चामुंडा नगर , विरार या दोघांना अटक केली आहे . आरोपीं कडून २ लाख ६७ हजारांचा ऐवज व चाकू जप्त केला आहे असे कदम यांनी सांगितले . अविनाशकुमार हा विरारला रहात असताना त्याची पुष्पा यांच्या मुलीशी ओळख होती . विक्रम , पुष्पा देखील त्याला ओळखत होते . त्यामुळे आरोपींना दुपारी पुष्पा घरी एकट्याच असतात याची कल्पना होती . या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत . दोन्ही आरोपीना १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .

Web Title: Police arrested who robbed old age lady by becoming a courier boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.