विवाहसंबधासाठी आलेल्या वसई पालघरच्या लोकांना जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:40 PM2019-03-28T15:40:08+5:302019-03-28T15:47:29+5:30

६ जणांना अटक केली असून  ३ फरार आहेत. 

The people of Vasai Palghar, who went for marriage were beaten up | विवाहसंबधासाठी आलेल्या वसई पालघरच्या लोकांना जबर मारहाण

विवाहसंबधासाठी आलेल्या वसई पालघरच्या लोकांना जबर मारहाण

Next
ठळक मुद्देतालुक्यातील पान्हेरा येथील रहिवासी सोपान उखर्डा गव्हाळे हा विवाह संबंध जोडण्याच काम करतो त्या धरतीवर वसयी जि.पालघर येधील दोशी परिवार मनिष नेमीचंद दोशी याच्या विवाहसंबधासाठी मलकापूरात आले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी  येथे ऑटो रिक्षा क्र. एम.एच.२८/एच.४६०८ ने मौजे वडोदा येथे पोहोचले.

मलकापूर - विवाह संबंधासाठी आलेल्या लोकांना जबर मारहाण करीत १ लाख ८७ हजाराचा ऐवज लुटल्याची घटना मौजे वडोदा येथे मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत पोलिसांनी ९ जणाविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ६ जणांना अटक केली असून  ३ फरार आहेत. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पान्हेरा येथील रहिवासी सोपान उखर्डा गव्हाळे हा विवाह संबंध जोडण्याच काम करतो त्या धरतीवर वसयी जि.पालघर येधील दोशी परिवार मनिष नेमीचंद दोशी याच्या विवाहसंबधासाठी मलकापूरात आले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी  येथे ऑटो रिक्षा क्र. एम.एच.२८/एच.४६०८ ने मौजे वडोदा येथे पोहोचले. परतीच्या वाटेवर असताना ऑटो चालकाने चुकीच्या मार्गाने रिक्षा घेतली. त्यात वडोदा व वाघुड दरम्यान मोटारसायकलीवरून ७ जण आले त्यांनी ऑटो रिक्षातील प्रवाशांना मारहाण केली. रोख १ लाख २३ हजार, मोबाईल व सोन्याचे दागिने असा १ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास केला. मारहाण झाल्याने महिलेसह चार जखमी झाले. जागृती दोशी, राजेंद्र दोशी, मनिष दोशी, भाविक संघवी या जखमीवर खाजगी दवाखान्यात उपचार झाले. बुधवारी भाविक वाडीलाल संघवी रा.वसई  यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक रमेश जायभये यांनी तपास चक्रे फिरवली व ६ जणांना अटक केली. बुधवारी रात्री सोपान उखर्डा गव्हाळे व विश्वनाथ काशिनाथ बावणे रा. पान्हेरा, ता. मलकापूर यांच्यासह सात अशा ९ जणांविरूध्द गुन्हा नं.४३/१९ कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा तपास पोलीस निरीक्षक रमेश जायभये करीत आहेत.

Web Title: The people of Vasai Palghar, who went for marriage were beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.