पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:27 PM2019-03-27T17:27:06+5:302019-03-27T17:28:28+5:30

कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.

Pakistani boat crashed; Indian Coast Guard, Gujarat ATS Action | पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

Next
ठळक मुद्देपोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानची अमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.  

गांधीनगर - अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्धवस्त करण्यात यश आले आहे. या बोटीत अंदाजे ५०० कोटीचे  १०० किलो हेरॉईन असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी ९ तस्करांना अटक करण्यात आली असून ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.
पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानचीअमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेराव घातला. यानंतर बोटीतील ९ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉईनच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.  



 

Web Title: Pakistani boat crashed; Indian Coast Guard, Gujarat ATS Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.