'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:27 AM2023-07-18T10:27:27+5:302023-07-18T10:27:58+5:30

Crime News : सहा महिन्यांआधी या तरूणीचं लग्न झालं होतं. तरूणीचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर प्रेमच करत नाही.

Newly wed women files police complaint against impotent husband | 'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल

'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल

googlenewsNext

Crime News : जगभरात पती-पत्नीच्या वादाच्या किंवा अजब नातेसंबंधाच्या हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. सामान्यपणे महिला पती त्रास देतो म्हणून पोलिसात तक्रार दाखल करतात. पण एका महिलेने केलेली तक्रार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लखनौमधून ही घटना समोर आली आहे. इथे एक नवविवाहित महिला पोलिसांकडे पतीची तक्रार घेऊन गेली होती.

सहा महिन्यांआधी या तरूणीचं लग्न झालं होतं. तरूणीचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर प्रेमच करत नाही. इतकंच नाही तर लग्नाला सहा महिने झाले पण पतीने अजून तिच्यासोबत संबंध ठेवले नाही. तरूणीचा पती आयटी कंपनीत नोकरी करतो. नवविवाहितेने आरोप केला की, तिचा पती नपुंसकही आहे.

पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत महिला म्हणाली की, सहा महिन्यांआधी तिचं लग्न झालं होतं. लग्नादरम्यान 15 लाख रूपये आणि बराच हुंडा देण्यात आला होता. साधारण 28 लाख रूपयांचा हुंडा देण्यात आला होता. आता तरूणीचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर प्रेम करत नाही. उपचार घेण्यास सांगितलं की, पतीच्या कुटुंबियांनी यास नकार दिला. तरूणीचा आरोप आहे की, पती तिच्यासोबत राहण्यास घाबरतो आणि लोकांचा विचार करून ती त्याच्यासोबत राहत आहे.

तरूणीने पोलिसांना सांगितलं की, मोठ्या प्रयत्नांनंतर तिने पतीला उपचारासाठी तयार केलं होतं. इतकंच काय तर खाजगी हॉस्पिटलमध्ये अपॉयमेंटही घेतली होती. पण पतीच्या कुटुंबियांनी त्याला रोखलं. आता सासरचे लोक तिला टोमणे मारून त्रास देत आहे. तरूणीचा आरोप आहे की, सासरच्या लोकांनी तरूणाबाबत ही माहिती लपवली आणि फसवून लग्न लावून दिलं. आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Newly wed women files police complaint against impotent husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.