लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 07:21 PM2019-07-13T19:21:54+5:302019-07-13T19:22:18+5:30

नागपूर - पांढुर्णा महामार्गावरील सावळी शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Murder of young girl Who live in relationship | लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या

लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या

Next

नागपूर - केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - पांढुर्णा (मध्य प्रदेश) महामार्गावरील सावळी (मोहतकर) शिवारात असलेल्या नालीच्या काठी शनिवारी (दि. १३) सकाळी तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा डोक्यावर दगड व शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायची, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिचा इतरत्र खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या शिवारात फेकला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली.  

खुशी जगजित परिहार, रा. हिंगणा असे मृत तरुणीचे नाव असून, ती अंदाजे १९ ते २१ वर्षे वयाची आहे. तिला ‘मॉडेलिंग’ची आवड होती. मात्र, ती तिच्या आईवडिलोसोबत न राहता वेगळी राहायची. शिवाय, आईवडिलांनीही तिच्याशी संपर्क तोडला होता. मध्यंतरी ती अशरफ अख्तर शेख (२८, रा. गिट्टीखदान, नागपूर) याच्या संपर्कात आली आणि दोघेही गिट्टीखदान, नागपूर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. अशरफ हादेखील त्याच्या आईवडिलांपासून वेगळा राहायचा. मात्र, तो त्यांच्या संपर्कात होता.

दरम्यान, तिचे दुस-यासोबत ‘अफेयर’ असल्याचा अशरफला खात्रीलायक संशय होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यात भांडणे व्हायची. त्यातच तिचा शनिवारी सकाळी सावळी (मोहतकर) शिवारात मृतदेह आढळून आला. तिला केस पकडून किमान १५ फुटांपर्यंत नेल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे तिचा एक बूट पायात होता तर दुसरा एक फूट उंचावर पडला होता. या मार्गावर रक्ताचे नमुने आणि तिचे केस तसेच घटनास्थळी एक फूट लांब वेणी आढळून आली. त्यामुळे तिचा इतरत्र खून करून मृतदेह कारने या ठिकाणी आणून फेकला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी केळवद पोलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Murder of young girl Who live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.