मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून आईने केली ६ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 14:06 IST2018-08-13T14:05:51+5:302018-08-13T14:06:50+5:30
या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून आईने केली ६ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या
ठाणे - भिवंडीत मातृत्वाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचं आपल्या पोटच्या गोळ्याची वैरी झाली आहे. जन्मदात्या आईने सहा महिन्याच्या मुलाला सततच्या रडण्यामुळं त्याची नाल्याच्या पाण्यात बुडवून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कल्पना निलेश गायकर (वय - २५) असं या महिलेच नाव असून ६ महिन्याच्या ऋषभ नावाच्या मुलाची हत्या केली आहे. ही घटना भिवंडीतील धापसीपाडा परिसरात घडली आहे.
कल्पना यांचा मुलगा ऋषभचा बुधवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणातून आपली सुखरूप सुटका व्हावी म्हणून आरोपी कल्पनाने ऋषभचा अपघाती मृत्यू झाला असं पोलिसांना भासवलं. मात्र, शवविच्छेदनानंतर ऋषभला पाण्यात बुडवून मारल्याचं उघड झालं. त्यावेळी पोलिसांनी कल्पना यांची सखोल चौकशी केली असता त्यांनीच ऋषभची हत्या केल्याची कबुली दिली. ऋषभ सतत आजारी पडायचा आणि सतत रडायचा. त्याचप्रमाणं कल्पनाही सतत आजरी पडत असल्यानं वैतागून तिने ऋषभला नाल्याच्या पाण्यात बुडवून मारल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.