भावाच्याच घरी केली छोटया भावाने चोरी, लाखोंचे दागिने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:15 AM2019-05-09T00:15:07+5:302019-05-09T00:16:23+5:30

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात २८ एप्रिलला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमध्ये ५ लाख ५४ हजार रु पयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता.

Little brother stole his brother's house, lakhs of jewelery seized | भावाच्याच घरी केली छोटया भावाने चोरी, लाखोंचे दागिने केले जप्त

भावाच्याच घरी केली छोटया भावाने चोरी, लाखोंचे दागिने केले जप्त

Next

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात २८ एप्रिलला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमध्ये ५ लाख ५४ हजार रु पयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरु वात केली आणि चोराला मुद्देमालासह अटक केले आहे. पोलिसांनी पकडलेला चोर दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्या घरात चोरी झाली त्याचा छोटा भाऊ आहे. सतीश तुकाराम दळवी (३८) असे त्याचे नाव आहे.

झालेली मोठी घरफोडी लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग वाढविन्लि होती या गुन्ह्याच्या तपास अधीकारी संध्या पवार ह्या आपल्या पोलीस टिमसह 1 मेच्या रात्री मोरेंगाव विभागात पेट्रोलिंग करित असताना पोलिसांच्या गाडीला बघून एक जण पळताना दिसला. संशय आल्याने त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याची झडती घेतलीे असता त्याच्याकडे सोन्याचे एक मंगळसूत्र आढळून आले. पोलिसांनी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांनी खाक्या दाखवताच मोठी घरफोडी झालेला गुन्हा उघड झाला आणि मोठ्या भावाच्याच घरी छोट्या भावाने चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याच्याकडून चोरी करण्यात आलेले ५ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे सर्व सोन्याचांदीचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय होती घटना......
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोडवरील वैष्णवी बिल्डिंगच्या सदनिका नंबर बी/०६ मध्ये राहणारे सत्यवान तुकाराम दळवी (३८) यांच्या घरी २८ एप्रिलला शनिवारी दुपारी सव्वा बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान मुलगा आर्यक घराचा दरवाजा उघडा ठेवून खेळण्यासाठी गेल्यावर चोराने घरात प्रवेश करून कपाटमधील लॉकरमधून २ लाख १२ हजार ५०० रुपयांचे साडे आठ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपयांचे तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ६२ हजार ५०० रु पयांचा अडीचा तोळ्याचा सोन्याचा हार, ३७ हजार ५०० रु पयांचा दीड तोळ्याचा सोन्याचा हार, २५ हजार रु पयांची १ तोळ्यांची व ३७ हजार ५०० रु पयांची दीड तोळ्यांची सोन्याची चेन, ३७ हजार ५०० रु पयांचे दीड तोळ्याचे व २५ हजार रु पयांचे १ तोळ्याचे व ३० हजार रु पयांचे सोन्याचे बे्रसलेट बारा ग्रामच्या सोन्याच्या तीन अंगठ्या आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ५४ हजार ऐवज लांबविला होता.

Web Title: Little brother stole his brother's house, lakhs of jewelery seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.