ग्रामसेवकाने विष घेऊन केली आत्महत्या; कल्याणमधील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 14:02 IST2018-11-02T13:59:22+5:302018-11-02T14:02:03+5:30
वाकळण ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत होते. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

ग्रामसेवकाने विष घेऊन केली आत्महत्या; कल्याणमधील धक्कादायक घटना
कल्याण - कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रघूनाथ हरड असं मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. वाकळण ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत होते. ही घटना वाकळण गावात घडली असून शील डायघर पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.