मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:37 AM2018-09-24T05:37:07+5:302018-09-24T05:37:24+5:30

  बिहारमधील मुझफ्फरपूर शहराचे माजी महापौर समीर कुमार (वय ५०) आणि त्यांचा चालक रोहित कुमार (४०) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

 Former mayor of Muzaffarpur shot dead | मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

googlenewsNext

मुझफ्फरपूर  -  बिहारमधील मुझफ्फरपूर शहराचे माजी महापौर समीर कुमार (वय ५०) आणि त्यांचा चालक रोहित कुमार (४०) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी रायफलीतून एकूण १७ ते १८ फैरी झाडल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक मुकुल रंजन यांनी दिली आहे. समीर कुमार हे २००२ ते ०७ या काळात मुझफ्फरपूरचे महापौर होते. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले. अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ सकाळी ७ वाजता ही घटना घडली.

Web Title:  Former mayor of Muzaffarpur shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.