अपघातात पती- पत्नी यांचा मृत्यू; तर सात प्रवासी जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:38 PM2018-10-18T21:38:42+5:302018-10-18T21:38:56+5:30

धुळे - शिरपूर तालुक्यातील जैतपुर फाट्याजवळ प्रवासी वाहतूक करणारे वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी यांचा मृत्यू झाला आहे. तर सात ...

Death of husband and wife in accident; Seven passengers were injured | अपघातात पती- पत्नी यांचा मृत्यू; तर सात प्रवासी जखमी  

अपघातात पती- पत्नी यांचा मृत्यू; तर सात प्रवासी जखमी  

Next

धुळे - शिरपूर तालुक्यातील जैतपुर फाट्याजवळ प्रवासी वाहतूक करणारे वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी यांचा मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी जखमी झाल्याची घटना आज विजयादशमीच्या दिवशी घङली. मृत हे तालुक्यातील बलकुवे येथील रहिवासी आहेत. शिरपूर येथून प्रवासी घेऊन थाळनेरकडे जाणारे वाहन मार्गावरील जैतपुर फाट्याजवळ उलटल्याने प्रकाश गंगाराम पाटील (वय ५१) व सुरेखा प्रकाश पाटील (वय ४५) या नवरा - बायकोचा मृत्यू झाला तर निलेश भिकनसिंह गिरासे (वय २५), संदिप गोरख भोई (वय २५), रमाबाई इंद्रसिग वाघ (वय ३५), शोभाबाई भास्कर पाटील (वय ५८), सखुबाई सजंय कोळी (वय ६५), मंगल केशव पाटील (वय ३०) आणि रोशनी बाबुलाल कोळी (वय १३) हे सात जण जखमी झाले आहे.  यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले असून दोघांवर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पती पत्नी हे मूळचे थाळनेर येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापासून बलकुवे येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असून यातील एक मुलगी विवाहित आहे. ते थाळनेर येथील नातेवाईक गणेश सोनवणे यांच्याकडे दसऱ्याला जात असताना ही दुर्दैवी घटना घङली. या घटनेचे वृत्त कळताच नगरसेवक तपनभाई पटेल जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, दिपक गुजर, अशोक कलाल, एकनाथ बोरसे, रमेश पाटील आदी रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करुन जखमींची विचारपूस केली. मृतांवर बलकुवे येथे सायंकाळी पाच वाजता अत्यंस्कार करण्यात आले.

Web Title: Death of husband and wife in accident; Seven passengers were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.