दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:28 PM2018-08-28T21:28:26+5:302018-08-28T21:29:24+5:30

दत्ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. मात्र, तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कार्मिक मंत्रालयाने नमूद केले आहे.

Datta Padalgikar gets three-month extension | दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ 

दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ 

मुंबई - राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर येत्या शुक्रवारी सेवेतून निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला.

दत्ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. मात्र, तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कार्मिक मंत्रालयाने नमूद केले आहे. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या राज्यात एटीएसची सुरु असलेली कारवाई असो की पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत देशभरात महाराष्ट्रपोलिसांकडून सध्या छापेमारी आणि धरपकड सुरु आहे. यापैकी चार जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. याच सर्व महत्वाच्या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Datta Padalgikar gets three-month extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.