Crime News: पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक 

By धीरज परब | Published: August 9, 2022 09:24 PM2022-08-09T21:24:06+5:302022-08-09T21:24:39+5:30

Crime News: इंस्टाग्राम वर मेक मनी होम ऑनलाईन अशी जाहिरात करून फसवणूक करणाऱ्या तिघांना मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे .

Crime News: Bank employee and three arrested for cheating online by pretending to earn money | Crime News: पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक 

Crime News: पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक 

googlenewsNext

- धीरज परब
मीरारोड - इंस्टाग्राम वर मेक मनी होम ऑनलाईन अशी जाहिरात करून फसवणूक करणाऱ्या तिघांना मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे . आरोपीं मध्ये एका खाजगी बँकेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे . तर ह्यात आणखी आरोपी असून त्यांचा तपास सुरु आहे.

नालासोपारात राहणाऱ्या दीपिका वर्मा यांना त्यांच्या इंस्टाग्राम वर मेक मनी होम ऑनलाईन या नावाची लिंक आली होती . लिंक क्लिक करत त्यांनी त्यांची वैयक्तिक व बँकेची माहिती भरली तसेच्या त्यांना त्या लिंकवर ऑनलाईन गेम टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्या प्रमाणे दीपिका यांनी केले असता त्यांची ८८ हजार ६०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली . त्या बाबत आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

ह्या गुन्हयाच्या तपासासाठी आचोळे पोलिसांनी सायबर गुन्हे शाखे कडे तांत्रीक मदत मागितली होती . त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह प्रविण आव्हाड, गणेश इलग, माधूरी धिंडे, सुवर्णा माळी, आकाश बोरसे यांच्या पथकाने फसवणूक झालेल्या रक्कमेबाबत तांत्रिक माहिती गोळा केली . तसेच पेटीएम, यस बँकेकडे पत्रव्यवहार व पाठपूरावा करुन रकमेच्या व्यवहाराचा सखोल तपशील , खातेदार आदींची माहिती मिळवली.

सायबर शाखेच्या पथकाने तपास करून पुरावे गोळा करत नालासोपारा येथे राहणारे विक्रम रंगनाथ केदारे रा. जय जिवदानी, नगिनदास पाडा व शैलेश शांताराम कापकर (३०) रा. साई भक्ती अपार्टमेंट, दत्त नगर तसेच सांताक्रूझच्या न्यू आग्रीपाडा , राम नगर येथे राहणाऱ्या सतिष सुरेश पाटील (३१) ह्या तिघांना अटक करून आचोळे पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपीतील शैलेश कापकर ह्याने बँकेत खाते उघडण्यासाठी विक्रम केदारे ह्याला महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे आमिष दाखवून  तेज ट्रेडिंग कंपनी नावाचे यस बँकेत खाते उघडले . त्या खात्यात फसवणुकीची रक्कम आली होती . तर सदर खाते उघडण्यासाठी सुरेश पाटील ह्या यस बँकेच्या कर्मचाऱ्याने कोणतीही पडताळणी न करताच खोटे केवायसी अपडेट करून खाते उघडण्यात मदत केली असल्याचे पोलिसांनी सांगितले .  
 

Web Title: Crime News: Bank employee and three arrested for cheating online by pretending to earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.