Shocking : पाणी पाजून पाजून 11वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, सावत्र आईसह वडिलांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:52 PM2020-06-18T17:52:08+5:302020-06-18T18:01:33+5:30

तीन महिन्यानंतर त्या रात्री काय घडलं हे कळलं...

Couple ‘killed 11-year-old son by forcing him to drink nearly three LITERS of water in just four hours’ | Shocking : पाणी पाजून पाजून 11वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, सावत्र आईसह वडिलांना अटक 

Shocking : पाणी पाजून पाजून 11वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, सावत्र आईसह वडिलांना अटक 

Next

सावत्र आई आणि वडिलांनी त्यांच्या 11वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला. मार्च महिन्याच्या 11 तारखेला या मुलाचा मृतदेह बेडरूममध्ये सापडला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि मागच्या भागातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळले होते. ही हत्या असल्याचा उलगडा तीन महिन्यांनंतर झाला. मुलाचे वडील आणि सावत्र आई यांनी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात करून घडलेला प्रसंग सांगितला. तो ऐकून पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला.

रायन सॅबीन ( 41 वर्ष) आणि तारा सॅबीन ( 42) असे या पालकांची नावं आहेत. यांना मंगळवारी कोलोराडो येथून अटक करण्यात आली.  मृत पावलेल्या मुलाचं नाव झॅचरी सॅबीन असं आहे. आरोपींना एल पासो कौंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तेथील महापौरांनी दिली. पोलिसांनी सांगितले की,'' या मुलाला उपाशी पोटी चार तासांत तीन लिटर पाणी पाजले गेले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बेडरूममध्ये झॅचरी हा मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला होता आणि मागच्या भागातून रक्तस्त्राव झाला होता. झॅचरीला झोपेत लघवी करण्याची समस्या होती आणि त्याला झोपताना पाणी प्यावे लागायचे, असे तपासात त्याच्या वडिलांनी सांगितले होते.''

झॅचरीच्या लघवीचा घाण वास यायचा आणि म्हणून त्याला जास्तीचं पाणी दिल्याचं, सावत्र आईने पोलिसांना सांगितले होते. तिनं पुढे सांगितले की,''झॅचरीला आनुवंशिक वैद्यकिय समस्या होती. माझे पती त्याला रोज जास्तीचं पाणी पाजायचे.''

10मार्चच्या रात्री काय घडलं?

त्या रात्री झॅचरीनं पाण्याचा घुरका घेतला आणि पाणी उडवत होता. त्यामुळे तो ढेकर देत होता. त्याच्या त्या कृतीनं रायनला राग अनावर झाला आणि त्यानं झॅरीचला दोन वेळा लाथेनं मारलं. त्याला बळजबरीनं पाणी पाजलं. त्यानंतर झॅचरी झोपला. 11.15 वाजता त्याला बेडवर पाहून सर्व काही ठीक असल्याचे त्यांना वाटले. पण, सात तासानंतर झॅचरीच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि त्यांनी 911 वर कॉल केला. या दोघांवर हत्या, बाल शोषण आणि मुलांवरील अत्याचाराचे अऩ्य सहा आरोप लावण्यात आले आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : सात वर्षांच्या बंदीनंतर एस श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार

कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral 

भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण

आयला.... युजवेंद्र चहलनं शेअर केला मुलीचा फोटो; तिच्याबद्दल जाणून तुम्हाला बसेल धक्का

 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती, माजी क्रीडा मंत्र्यांचा धक्कादायक दावा 

Photo: टीम इंडियाच्या 'गब्बर'ची मुलगी आहे बिनधास्त; बॉयफ्रेंडसोबत मुंडन केल्यानं आली होती चर्चेत!

Web Title: Couple ‘killed 11-year-old son by forcing him to drink nearly three LITERS of water in just four hours’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.