कंपनीच्या खिडकीची ग्रील तोडून परदेशी चलन केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:11 PM2018-07-13T21:11:58+5:302018-07-13T21:31:02+5:30

गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

The company has broken the grill of the window and made a foreign currency lump | कंपनीच्या खिडकीची ग्रील तोडून परदेशी चलन केले लंपास

कंपनीच्या खिडकीची ग्रील तोडून परदेशी चलन केले लंपास

Next

 

मुंबई - गारमेंट कंपनीच्या खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचे परदेशी चलन चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोरेगाव पश्चिम येथील उद्योग नगर, शीला इंडस्ट्रीज, कामत क्लबजवळ रवी प्रेमजी छेडा (वय - ३३) यांची गारमेंट कंपनी आहे. ११ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने कंपनीच्या खिडकीचे ग्रील तोडुन आत प्रवेश केला व  कपाटात असलेले १०० अमेरिकन डॉलर, २. ५५ टर्किश डॉलर असे एकूण साडेतीन लाखांचे परदेशी चलन चोरून नेल्याची दुसऱ्या दिवशी उघड झाले. छेडा यांनी या प्रकरणी गोरेगाव पोलिसांत तक्रात दाखल केली. 

 

Web Title: The company has broken the grill of the window and made a foreign currency lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.