अंधेरीत जिवंत मांजरीला जाळले; पोलीस ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 03:57 PM2018-12-04T15:57:41+5:302018-12-04T16:00:13+5:30

याप्रकरणी स्थानिक प्राणीप्रेमींनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मांजरीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तपास करुन अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगितले आहे.

Burned alive cat in the dark; Complaint to the police station | अंधेरीत जिवंत मांजरीला जाळले; पोलीस ठाण्यात तक्रार 

अंधेरीत जिवंत मांजरीला जाळले; पोलीस ठाण्यात तक्रार 

ठळक मुद्देएका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळून क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार घडलागावदेवी इमारतीच्या मागील बाजूस मृतावस्थेत मांजर आढळून आली मृत मांजरीला परळ येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं

मुंबई - भटक्या कुत्र्याला मारहाण केल्याप्रकरणी अलीकडेच मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, यापेक्षाही भयंकर प्रकार अंधेरीतील ओशिवरा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळून क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार घडला आला आहे. याप्रकरणी स्थानिक प्राणीप्रेमींनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मांजरीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तपास करुन अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगितले आहे.

ओशिवरा परिसरातील गावदेवी इमारतीच्या मागील बाजूस मृतावस्थेत मांजर आढळून आली. या मांजरीला उपाशी ठेवण्यात आलं होत. तसेच तिला बांधून त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी मांजरीला जाळण्यात आलं त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाहीत. त्यामुळे या घटनेचा छडा लावण्यात अडचणी निर्माण होत आहे. तसेच या मृत मांजरीला परळ येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असल्याची माहिती ‘बेजुबान पब्लिक वेलफेअर ट्रस्ट’च्या हेमा चौधरी यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Burned alive cat in the dark; Complaint to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.