व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून ; राहटणीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 02:47 PM2018-07-24T14:47:01+5:302018-07-24T14:47:52+5:30

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला.

buisness man shoot in rahatni | व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून ; राहटणीतील घटना

व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून ; राहटणीतील घटना

Next

पिंपरी:  दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला. ही घटना राहटणी येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.

    अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी रहाटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. रोजचे काम उरकून ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले असता प्रभात कॉलनी, रहाटणी येथे त्यांना चोरट्याने अडवले. त्यांच्याकडील 1लाख 86 हजारांची रोकड हिसकावली. त्यावेळी चोरटे आणि धोत्रे यांच्यात झटापट झाली. चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात धोत्रे यांचा मृत्यू झाला. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू आहे.
लुटमारीच्या उद्देशाने खून झाला की अन्य काही कारण आहे,याचा पोलीस  शोध घेत आहेत. आठवड्यापूर्वी याच परिसरात टेम्पो चालकाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही, अशातच आणखी एक खुनाची घटना याच परिसरात घडली आहे.  दोन खुनाच्या घटना घडल्याने राहटणी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: buisness man shoot in rahatni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.