बाईक हळू चालव सांगणं पडलं जीवघेणं, तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:58 IST2018-09-24T16:58:15+5:302018-09-24T16:58:40+5:30
पोट, छाती व गुप्तांगावर जबर मारहाण झाल्याने विनोदचा मृत्यू झाला. हा प्रकार कळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागेश आणि शशी या दोघांना अटक केली.

बाईक हळू चालव सांगणं पडलं जीवघेणं, तरुणाची हत्या
मुंबई - बाईक हळू चालविण्यास सांगितल्याच्या रागातून धारावीत एका तरुणाची दोघांनी जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोघा आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत.
धारावी येथील 90 फिट रोडवरील कामराज युथ असोसिएशन मंडळ गणेशोत्सव मंडपासमोर विनोद देवेंद्र (वय - 29) हा रस्ता ओलांडत असताना बाईकवरून दोघेजण आले. तेव्हा विनोदने दोघांना बाईक हळू चालविण्यास सांगितले. याचा राग मनात धरून नागेश कोडम आणि शशी शेरखाने या दोघांनी विनोदला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. पोट, छाती व गुप्तांगावर जबर मारहाण झाल्याने विनोदचा मृत्यू झाला. हा प्रकार कळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागेश आणि शशी या दोघांना अटक केली.