पुण्यात कुत्र्याला हटकल्याने दोघांवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:02 PM2019-02-20T15:02:11+5:302019-02-20T15:03:30+5:30

केवळ कुत्र्याला हटकल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला आहे़.

attack by weoapan on two peoples Due to disturb dog at pune | पुण्यात कुत्र्याला हटकल्याने दोघांवर कोयत्याने वार

पुण्यात कुत्र्याला हटकल्याने दोघांवर कोयत्याने वार

googlenewsNext

पुणे : केवळ कुत्र्याला हटकल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला आहे़. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. 
विजय महिपत सपकाळ (वय ४०), जय संजय सपकाळ (वय २२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे़ सनी व त्याच्या मित्राचा पोलीस शोध घेत आहे़.
याप्रकरणी अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़. १९ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रणदिवे हे त्याचा मित्र सिद्धार्थ घायतडक यांच्याबरोबर कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरुन जात होते़. यावेळी तेथील कुत्री त्यांच्या अंगावर आली़ त्यामुळे रणदिवे यांनी कुत्र्याला हाकलले़ यावरुन विजय सपकाळ व इतरांना राग आला़. त्यांनी रणदिवे व सिद्धार्थ घाततडक यांना शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, तोंडावर, हातावर व पायावर मारहाण करुन जबर जखमी केले़ रणदिवे यांची मोटारसायकल फोडून त्याचे नुकसान केले़.  

Web Title: attack by weoapan on two peoples Due to disturb dog at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.