संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 19:22 IST2018-09-20T19:22:10+5:302018-09-20T19:22:34+5:30
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय वडिलांना कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक
ठाणे - एका नराधम बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या चार वर्षापासून मुलीवर नराधम बापाचा अत्याचार सुरू होता. पीडित मुलीने शेजारी राहणाऱ्या लोकांना हा प्रकार सांगितल्यावर हि खळबळजनक घटना समोर आली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय वडिलांना कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीची आई आणि वडिलांचा घटस्फोट झाला आहे. मुलगी वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांसोबत राहत होती. तिचे वडील तिला घराच्या बाहेर जाण्याची देखील मुभा देत नसत. वायरमनचे काम करणारे वडील नेहमी शारीरिक त्रास देत असल्याचे पीडितेने सांगितले आहे. हा सर्व घडला प्रकार पोलिसांनी मुलीच्या आईला कळवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक करून त्याच्यावर पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे.